प्रतिनिधी माणगाव : सिकंदर आंबोणकर
दि.३१ मार्च २०२४ रोजी ओव्हल मैदान,मुंबई येथे प्रथमच जय भवानी क्रिकेट संघ हुनरवेली,ता.श्रिवर्धन यांनी मर्यादित षटकांचे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.स्पर्धेमधे एकुण २४ संघांनी भाग घेतला होता.प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो चंडिका आयरोली,दापोली,व्दितीय क्रमांक भोस्ते ह्या संघाने तर तृतीय क्रमांक मेघरे ह्या संघांनी पटकाविला...
स्पर्धेचे आयोजन ग्रामस्थ मंडळ,जय भवानी क्रिकेट संघाचे खेळाडू यांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी फार मेहनत घेतली व खेळी मेळीच्या वातावरणात सामने पार पडले...
सामन्यांसाठी आलेल्या पाहुण्यांचा, खेळाडूंचा यथोचित मान सन्मान राखला व हुनरवेली गावाची एकीचं प्रत्यय आणून दिला...
