महाराष्ट्र वेदभुमी

ज्यांच्यापाठीशी शेतकरी कामगार पक्ष असतो त्यांचा विजय निश्चित असतो – जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे


अलिबाग :विशेष प्रतिनिधी 

 ज्यांच्यापाठीशी शेतकरी कामगार पक्ष असतो त्यांचा विजय निश्चित असतो असे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी अलिबाग मध्ये झालेल्या आढावा बैठकीत सांगितले, यावेळी राज्यमंत्री स्व.मीनाक्षीताई पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ३२ रायगड लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्भूमीवर अलिबाग शहराची आढावा बैठकीचे आयोजन अलिबाग गोविंद नगर, डॉ. फुटाणे हॉस्पिटल समोर, चेंढरे बायपास रोड अलिबाग येथे दि.०२ एप्रिल रोजी सायंकाळी ७.०० वाजता घेण्यात आली. बैठकीसाठी प्रचंड मोठ्या संखेने शिवसैनिक उपस्थित होते...

              तटकरे हे गदारच आहेत पहिले अंतुलेंना फसवलं आणि आता शरद पवारांना फसवले, म्हणून शरद पवारांनीच पक्षप्रमुख उद्धवजिंकडे अनंत गीते यांची उमेदवारी मागितली जेणेकरून हि गदारीची घाण नष्ट करता येईल, अनंत गीतेंसारखे सदाचारींची गरज जनतेला आहे तटकरेंसारखे भ्रष्टाचारींची गरज जनतेला नाही. लोकसभा मतदार संघाच गणितच असा आहे शेतकरी कामगार पक्ष ज्याचा पाठीशी आहे त्याच पक्षाचा खासदार निवडून येतो, तसेही महाविकास आघाडीमुळे आज शेकाप, कॉंग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी असे बलाढ्य पक्ष आपल्यासोबत आहेत त्यामुळे तटकरेंचा भुई सपाट निश्चित होणार असे जिल्हाप्रमुखांनी भाषणात विरोधकांना खडे बोल सुनावले...

              अलिबाग शहर प्रमुख संदीप पालकर यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला तर अनेक शिवसैनिकांची नियुक्ती करण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, युवा जिल्हाअध्यक्ष अमिर ठाकूर, तालुका प्रमुख शंकर गुरव, उपजिल्हा संघटक अजित पाटील, विधानसभा संघटक कृष्णा कडवे, अलिबाग प्रवक्ते धनंजय गुरव, तालुका संघटिका सौ. स्नेहल देवळेकर, विधानसभा संघटिका सौ.तनुजा पेरेकर व पदाधिकारी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post