महाराष्ट्र वेदभुमी

कु. प्रथम नितेश कडू फाऊंडेशन धोकवडे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मरीदेवी धेरंड संघ विजयी

 


अब्दुल सोगावकर : अलिबाग

सोगाव : अलिबाग तालुक्यातील धोकवडे येथे कु. प्रथम नितेश कडू फाऊंडेशन धोकवडे आयोजित जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे गुरुवार दि. २१ मार्च २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते...

           या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना रायगड जिल्हा संघटक(उद्धव ठाकरे गट)आमिर(पिंट्या)ठाकूर यांच्याहस्ते व कृष्णा भाई कडवे, दिलिप कडू, धनंजय गुरव, अलिबाग शिवसेना(उद्धव ठाकरे गट)महिला संघटिका स्नेहल देवळेकर, प्रमोद कडू, प्रिती सुबोध कडू, काजल प्रणित कडवे, धोकवडे न.२ ग्रामस्थ, गावदेवी धोकवडे ग्रामस्थ मंडळ, मांडवा जेट्टी मित्रपरिवार व ग्रामस्थ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले... 

          स्पर्धेत अंतिम सामना मरीदेवी धेरंड संघ व ओंकार वेश्वी या संघात झाला, यामध्ये अटीतटीच्या लढतीत मरीदेवी धेरंड संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला, तर ओंकार वेश्वी संघाने द्वितीय क्रमांक पटकावला, तसेच नागेश्वर आवास संघाने तृतीय क्रमांक पटकावला आणि पांडबादेवी रायवाडी संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. यावेळी उत्कृष्ट खेळाडू म्हणून मरीदेवी धेरंड संघाचा ऋतिक पाटील याचा सन्मान करण्यात आला आणि उत्कृष्ट चढाई म्हणून नागेश्वर आवास संघाचा अक्षय कवळे याला सन्मानित करण्यात आले, तर उत्कृष्ट पकड म्हणून ओंकार वेश्वी संघाचा मनिष पाटील याचा गौरव करण्यात आला आणि पब्लिक हिरो म्हणून पांडबादेवी रायवाडी संघाचा केदार लाल याला गौरविण्यात आले... 

     या स्पर्धांचे बक्षीस वितरण सामाजिक कार्यकर्ते सतिश म्हात्रे व रमेश म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले, स्पर्धेत समालोचन धनंजय भगत सर व पोविलकर सर यांनी उत्कृष्टरित्या करत खेळाडूंची व प्रेक्षकांची मने जिंकली... स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कु. प्रथम नितेश कडू फाऊंडेशन चे कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली...

फोटो लाईन : धोकवडे कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता मरीदेवी धेरंड संघाला पारितोषिक देताना मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post