महाराष्ट्र वेदभुमी

सुतारवाडी येथे लायन्सक्लब कोलाड च्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.


खांब (नंदकुमार कळमकर ) 

रोहा तालुक्यातील मौजे सुतारवाडी येथे लायन्स क्लब कोलाड रोहा ,लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहा,लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग,अंशुल स्पेशालिटी लिमिटेड,तसेच डॉ गांधी नर्सिंग होम यांच्या वतीने आणि ग्रुप ग्राम पंचायत येरल यांच्या सहकार्याने मौजे सुतारवाडी येथे रविवारी १० मार्च रोजी नेत्र तपासणी व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे..

इंटरनॅशनल लायन्स क्लब ऑफ डिस्ट्रिक ३२३१ ए ४ यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड लायन्स क्लब गेली तीन वर्ष कोलाड विभाग आणि परीसरा सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रिडा, पर्यावरण, अशा विविध प्रकारच्या उपक्रम राबवित असून या अनुषंगाने तालुक्यातील तसेच येरल ग्राम पंचायत हद्दीतील मौजे सुतारवाडी येथील श्री दत्त मंदीर सभागृह येथे नेत्र तपासणी आणि मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी या परिसरातील नागरिकांनी तसेच रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लब कोलाड आणि सुतारवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे तसेच यासाठी ग्राम पंचायत येरळ आणि सुतारवाडी ग्रामस्थ,महीला व युवक मंडळ यांच्या सहकार्याने हे नेत्र तपासणी शिबिर श्री दत्त मंदीर सभागृह सुतारवाडी येथे आयोजित करण्यात आले असून त्यासाठी पत्रकार हरिश्चंद्र महाडीक 9359579110,

नथूराम साळवी 8080820832,

राजाराम किरजत 8208533362,

समृध्दी साळवी 9579544340,

दत्ताराम मंचेकर 9403092967,या क्रमांकावर संपर्क साधून आपली नावे नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सुतारवाडी ग्रामस्थ आणि लायन्स क्लब कोलाड चे सर्व पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post