महाराष्ट्र वेदभुमी

शुद्ध पाणी आर.ओ प्लांटची सुविधा चौलकरांसाठी उपलब्ध. ७.५० लाखाचे जलशुद्धीकरण यंत्रणेंचे लोकार्पण.

अलिबाग (ओमकार नागावकर) : 

चौलकरांसाठी फक्त पाणी नाही, तर शुद्ध आर.ओ (RO) जलशुद्धीकरण यंत्रणे लोकार्पण सोहळा दि.०५ मार्च रोजी पार पाडण्यात आला... १५ वे वित्त आयोगाच्या निधीतून चौल गावाच्या विकासासाठी सुमारे दोन लाख पन्नास हजार किमतीचे असे तीन आर.ओ (RO) जलशुद्धीकरण यंत्रणे बसविण्यात आले...माजी रायगड जिल्हापरिषद विरोधी पक्षनेते सुरेंद्रदादा म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत चौल आग्राव, चौल चुनेकोळीवाडा, चौल सराई येथील यंत्रणांचे लोकार्पण करण्यात आले... आर.ओ. RO (Reverse Osmosis) फिल्टर जलशुद्धीकरण यंत्र फ्लोराईड, क्षार, तळाशी बसून राहणारे घटक, क्लोरीन, अर्सेनिक, कार्बनची विविध संयुगे फिल्टर करते त्यामुळे पाणी पूर्णतः शुद्ध होते... शुद्धजल मिळावं या दृष्टीने चौल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यापूर्वी देखील जलशुद्धीकरण यंत्रणे चौल गावात बसविण्यात आली आहेत, तर बसविण्यात आलेल्या आर.ओ यंत्रणेंचा गावातील चार ते पाच हजार ग्रामस्थांना ५० पैसे प्रती लिटर अशा दराने  शुद्धजलाचा लाभ घेता येणार आहे...  

 जलशुद्धीकरण यंत्रणे लोकार्पण सोहळ्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रदादा म्हात्रे, ग्रामसेवक सौ.ऋतिका पाटील, सरपंच प्रतिभा पवार, उपसरपंच अजित गुरव, ग्रामपंचायत सदस्य अतुल वर्तक, निकेत मळेकर, अजित मिसाळ, मारूती भगत, मंदार नाईक, सुधीर नाईक, दत्ता अधिकारी, दिपक मळेकर, नरेश भोईर, निवेदिता मळेकर, जयवंत नाईक, रोहित पाटील, कैलास वर्सोलकर,चौल ग्रामपंचायत कर्मचारी, आदि चौल आग्राव, चुनेकोळीवाडा, सराई ग्रामस्थ उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post