महाराष्ट्र वेदभुमी

आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी सन्मानित,



सोगाव :अलिबाग: अब्दुल सोगावकर  

मूनवली ग्रामस्थांनी सचिन घाडी यांना 'आदर्श सामाजिक कार्यकर्ता' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गावात केला जाहीर सत्कार,

अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन गुरुवार दि.६ मार्च रोजी संध्याकाळी पिल्लई कॉलेज, नवीन पनवेल येथील झालेल्या कार्यक्रमात "आदर्श सामाजिक कार्यकर्ता" म्हणून मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन(भाऊ) घाडी यांना त्यांच्या सहपत्नी सह रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख व पिल्लई कॉलेजच्या कार्यकारी संचालिका यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले...

           या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. या सर्व मान्यवरांचे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सचिन घाडी यांचे कौतुक करत यापुढेही असेच सामाजिक कार्य अधिक जोमाने करावे व आपल्या सारखे सामाजिक कार्यकर्ते निर्माण करावे, असे सर्व उपस्थितांना आवाहन केले...


    या 'आदर्श सामाजिक कार्यकर्ता' पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल आपल्या मूळगावी मूनवली महिला मंडळ व मूनवली ग्रामस्थांनी अभिनंदन केले व सचिन घाडी यांना गावातील हनुमान मंदिरात जाहीर सत्कार करत फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी लहान मुले व मुली, महिला, पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते...

फोटो लाईन :-

पहिल्या चित्रात : सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना 'आदर्श सामाजिक कार्यकर्ता' हा पुरस्कार देताना पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख व इतर मान्यवर,

दुसऱ्या चित्रात : रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचे कौतुक करताना,


तिसऱ्या चित्रात : सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना'आदर्श सामाजिक कार्यकर्ता' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मूळगावी मूनवली येथे सत्कार करताना ग्रामस्थ,

Post a Comment

Previous Post Next Post