महाराष्ट्र वेदभुमी

रेशनवरच्या साड्या केल्या सरकारला परत ; रोहा तहसील कार्यालयात साड्यांचा ढीग, जिजाऊंच्या लेकींनी केला रोष व्यक्त

 


रोहा - प्रतिनिधी ;-  

सरकार मणिपूरमध्ये काय चालले आहेे, यावर चकार शब्द काढत नाही. आमच्या माता-भगिनींची लाज, मानसन्मान सरकार राखत नसेल तर रेशनवर सरकारने दिलेल्या साड्या घेणे कितपत योग्य..?असा सवाल करत सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी रायगडात जनआंदोलन सुरू केले आहे... आज शेकडो मुलनिवासी महिलांसह रेशनवर महिलांना मिळालेल्या मोफत साड्या त्यांनी रोहा तहसील कार्यालयात जमा केल्या... परिणामी तहसीलदार कार्यालयात अक्षरश: साड्याचा ढिग जमा झाला.  या साड्या परत करणे नव्हे, तर जिजाऊ-सावित्रीच्या लेकींनी सरकारच्या तोंडावरच या साड्या मारल्या असल्याचे रोष यावेळी महिलांनी बोलून दाखविले...

यावेळी उल्का महाजन यांनी भाजपा सरकारच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला... भाजप सरकार संविधान विरोधी आहे, हे लपून राहिलेले नाही... त्यामुळे वेळीच धोका ओळखून भाजपाचा पाडाव करणे हे गरजेचे आहे... कामगार, महिला शेतकर्‍यांविरोधात जुलमी कायदे आणलेत... रेशन दुकानात मोफत धान्य वाटण्याचा दावा केला जातो... प्रत्यक्षात शेतकरी आत्महत्या वाढीच्या 14 जिल्ह्यात मोफत धान्य रद्द केले, हे संतापजनक आहे, असा संताप महाजन यांनी व्यक्त केला... देशात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली... शेतकरी संकटात आहे... महिला सुरक्षीत नाहीत...भिकेचे तुकडे फेका, हक्क काढून घ्या, असेच भाजपाचे देश, राज्यात सुरू आहे...जुलमी कायदे श्रमिक कष्टकर्‍यांच्या मुळावर उठले आहे... तेच राज्यातील शिंदे फडणवीस सरकार महिलांना रेशन दुकानातून साडी देत आहे... महिला अत्याचाराविरोधी गुन्हे दाखल करत नाहीत... गुन्हेगार भाजपा, मित्रपक्ष सत्ताधारी असतील तर मोकाट सोडले जातात, आरोपींचा हार घालून सत्कार केला जातो हे भयानक आहे, असा संताप उल्का महाजन यांनी व्यक्त केला...

Post a Comment

Previous Post Next Post