अब्दुल सोगावकर :अलिबाग
चोंढी येथे रेल्वे मार्गालागत मुशेत रस्त्याची किहीम सरपंच पिंट्या व रेल्वे सहाय्यक अभियंता यांनी केली पाहणी..
सोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथे आर.सी.एफ. रेल्वे मार्गालागत नव्याने बांधणी केलेल्या व मुशेत कडे जाणाऱ्या निकृष्ठ दर्जाच्या रस्त्याची किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व आर.सी.एफ. रेल्वे सहाय्यक अभियंता वाडेकर यांनी पाहणी केली...
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोंढी येथे रेल्वे फाटका लगत मुशेतकडे जाणारा जुना रस्ता बंद करून नवीन रस्त्याची बांधणी करण्यात आली आहे, परंतु हा रस्ता अडचणीचा व निकृष्ट दर्जाचा बनवला आहे, या खराब रस्त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने तसेच या रस्त्यावर वाहन चालवताना व वळसा घेताना अडथळा निर्माण होत असल्यामुळे याबाबत किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व मुशेत ग्रामस्थांनी आर.सी.एफ. रेल्वे अधिकारी यांच्याकडे होणाऱ्या गैरसोयीबाबतीत तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने रेल्वे सहाय्यक अभियंता वाडेकर यांनी बुधवार दि. २० मार्च २०२४ रोजी दुपारनंतर पाहणी करण्यासाठी आले होते, यावेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व मुशेत ग्रामस्थांनी ठेकेदाराविरुद्ध विरुद्ध संताप व्यक्त करत सदर रस्ता योग्य त्याप्रकारे बनवावा, अशी मागणी रेल्वे सहाय्यक अभियंता यांच्याकडे केली...
यावेळी आर. सी. एफ. रेल्वे सहाय्यक अभियंता वाडेकर यांनी ठेकेदारविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसेच रस्त्याची योग्य ती दुरुस्ती लवकरच करून देण्यात येईल, असे आश्वासन किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व मुशेत ग्रामस्थांना दिले आहे...
यावेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड, मनिष म्हात्रे, आर. सी. एफ. रेल्वे सहाय्यक अभियंता वाडेकर, मुशेत पोलिस पाटील चंद्रशेखर सुर्वे व ग्रामस्थ उपस्थित होते...
फोटो लाईन : चोंढी येथे आर. सी. एफ. रेल्वे मार्गाजवळ मुशेत कडे जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची पाहणी करताना रेल्वे सहाय्यक अभियंता वाडेकर व किहीम सरपंच पिंट्या गायकवाड तसेच मुशेत ग्रामस्थ,
