दिनांक ४ फेब्रुवारी सुधागड पाली येथे को. ऐ.सो.माध्यमिक विद्यालय घोसाळे...एस. एस. सी.बॅच १९९६-९७ माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला...सर्व माजी विद्यार्थी नोकरी,व्यवसाय,राजकारण, समाजकारण,शेती आदी उद्योग व्यवसायात प्रामाणिक मेहनत व चिकाटीने काम करीत आहेत,असे मनोगत व्यक्त केले.यावेळी प्रत्येकाने आपल्या वर्गातील जुन्या आठवणींना उजाळा दिला...
सर्व शिक्षकाच्या अध्यापनाची आठवण काढली."शाळेत असताना शाळेचे महत्त्व वाटत नाही" पण आज आम्हाला खूप शाळेत यावेसे वाटते.मज्जा करावीशी वाटते.आम्ही कितीही मोठे झालो,यशस्वी झालो तरी आम्ही विद्यार्थीच आहोत..." शेवटी गुरुविण ज्ञान तोकडेच"
या प्रसंगी माजी विद्यार्थी या नात्याने " शिक्षणातून समृद्धीकडे " या संकल्पनेतून आपली भविष्यातील वाटचाल तसेच येणारी आव्हाने या विषयी चर्चा करण्यात आली...तसेच येणाऱ्या काळात आपण समाजात ,गावपातळीवर कशा प्रकारे कालबध्द कार्यक्रम राबवू शकतो.या वर सविस्तर चर्चा करण्यात आली...
आमच्या यशाचे मानकरी आमचे गुरूच आहेत व गुरूंचे ऋण कधीच विसरता येत नाही...असे बोलून मनोगत व्यक्त केलें...
