महाराष्ट्र वेदभुमी

“भूमिपुत्ररत्न” महेंद्रशेठ घरत यांचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडून कौतुक !



उरण दि ५(विठ्ठल ममताबादे) 

लोकनेते दि.बा.पाटील साहेबांनंतर स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढणारे महेंद्रशेठ घरत यांना आत्ताच राज्यस्तरीय भूमिपुत्ररत्न पुरस्कार मिळाल्याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कौतुक केले. भूमिपुत्रांसाठी लढतांना प्रत्येक गावासाठी खेळाचे मैदान, जलकुंभ, समाज मंदिरे आणि  सर्वात महत्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्ग बाधित तसेच न्हावा - शिवडी सागरी सेतू, उरण - नेरूळ रेल्वे मार्ग  प्रकल्पग्रस्तांना ९ ते २० कोटी रुपये प्रमाणे जमिनीचे भाव देण्याचे  व विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तान प्रमाणे सुविधा मिळवून देण्याचे काम महेंद्रशेठ घरत यांनी केले आहे. याची दखल घेत माजी मुख्यमंत्री  अशोकराव चव्हाण  यांनी महेंद्रशेठ घरत यांच्याकडून सर्व कागदपत्रे पाहून नांदेड येथे होवू घातलेल्या महामार्ग बाधित प्रकल्पग्रस्तांना सुद्धा अशा प्रकारचा मोबदला मिळण्यासाठी मागणी करणार आहेत. महेंद्रशेठ घरत यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व पोटतिडकीने भूमिपुत्रांसाठी केलेल्या कार्याचे कौतुक अशोकराव चव्हाण यांनी केले व आपण भविष्यातही भूमिपुत्रांसाठी असेच लढत रहा तुम्हाला यश नक्कीच मिळेल अशा शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post