महाराष्ट्र वेदभुमी

सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना 'कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२४' प्रदान



अब्दुल  सोगावकर अलिबाग

सोगाव :सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा, कला, अध्यात्मिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे  अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना उपस्थित मान्यवरांच्या यांच्याहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत 'कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२४' मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला... 

आआध्य शिक्षिका, कवयित्री सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंती निमित्त भाई जगताप मित्रमंडळ - रायगड, काँग्रेस सेवा फाऊंडेशन - रायगड, मधूशेठ ठाकुर चॅरिटेबल ट्रस्ट- रायगड, विश्वजित दादा कदम युवा मंच, उमेश ठाकुर मित्रमंडळ यांचे संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत सातिर्जे मैदान, अलिबाग-रायगड येथे सायंकाळी ५:३० वाजता युवक मार्गदर्शन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते... या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे हे १३ वे वर्ष असून सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा तसेच पत्रकारिता, वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांना संस्थेच्या वतीने यापूर्वी 'कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे...  


मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी क्षेत्रात कार्यरत राहून आपली सामाजिक बांधिलकी जपत आहेत... सचिन घाडी हे सामाजिक कार्य करीत असताना लहान - मोठा, गरीब - श्रीमंत, जात - धर्म असा कोणताही भेदभाव न करता ते आपले कार्य समाजासाठी केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून मनोभावे करीत आहेत... घाडी यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता आजतागायत अनेक सामाजिक व उल्लेखनीय कार्य केले आहेत, याची दखल वरील संस्थांनी घेऊन त्यांची 'कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२४' साठी निवड केली होती...सातिर्जे येथील भव्य दिव्य कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला, याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचे सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे... या पुरस्कारासाठी अंदाजे ९०० पेक्षा जास्त अर्ज दाखल झाले होते, त्यातील सुमारे ७२ निवडक विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना शाल, श्रीफळ व कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले...

 या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी शेकापचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषद आमदार जयंत पाटील, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पंडितशेठ पाटील, रा.जि.प. माजी अध्यक्ष आस्वाद (पप्पूशेठ) पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, गुरुवर्य चांदोरकर सर, शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडीच्या नेत्या चित्रलेखाताई पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल थळे, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी चिटणीस प्रविणदादा ठाकुर, काँग्रेस सेवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाषचंद्र गोडसे, मुंबई काँग्रेस कमिटीचे चिटणीस अनंत जाधव, रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकुर, रायगड जिल्हा परिषदेचे माजी प्रतोद काका ठाकुर, माजी जि.प. सदस्या रविना ठाकुर, माजी जि. प.सदस्या चित्रा पाटील, काँग्रेस सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश ठाकुर, किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, सातिर्जे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्राची ठाकुर, अलिबाग तालुका काँग्रेस अध्यक्ष भास्करराव चव्हाण, बेलोशी सरपंच कृष्णा भोपी, खिडकी सरपंच वैभव पाटील, मुळे उपसरपंच राकेश पाटील, काँग्रेस नेत्या सुजाता कोळी, मापगाव विभाग काँग्रेस सरचिटणीस विवेक जोशी, सातिर्जे पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सूचित थळे यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते व उमेश ठाकुर मित्रमंडळाचे कार्यकर्ते, तसेच कुलाबा जीवन गौरव पुरस्कार समिती अध्यक्ष श्रीयश घरत व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...

        या कार्यक्रमात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लढणाऱ्या इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय घरत यांनी करत सर्व उपस्थितांची मने जिंकली.

*फोटो लाईन :* मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कार २०२४ प्रदान करताना माजी आमदार पंडितशेठ पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनिल थळे, शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, काँग्रेस सेवा फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाषचंद्र गोडसे, काँग्रेस सेवा फाउंडेशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष उमेश ठाकुर, मुंबई काँग्रेस कमिटीचे चिटणीस अनंत जाधव व इतर मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post