महाराष्ट्र वेदभुमी

शनिवार भजन मंडळ, बहिरोळे यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कार २०२४ ने केले सन्मानित*


अब्दुल  सोगावकर अलिबाग

सोगाव :  अलिबाग तालुक्यातील नामांकित भजन मंडळांपैकी एक असणारे बहिरोळे येथील शनिवार भजन मंडळ,बहिरोळे यांना कुलाबा जीवन गौरव पुरस्कार २०२४ ने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले...

      आध्य शिक्षिका, कवयित्री सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंती निमित्त भाई जगताप मित्रमंडळ - रायगड, काँग्रेस सेवा फाऊंडेशन - रायगड, मधूशेठ ठाकुर चॅरिटेबल ट्रस्ट- रायगड, विश्वजित दादा कदम युवा मंच, उमेश ठाकुर मित्रमंडळ यांचे संयुक्त विद्यमाने व ऍड उमेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत सातिर्जे मैदान, अलिबाग-रायगड येथे सायंकाळी ५:३० वाजता युवक मार्गदर्शन व गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते... या सोहळ्याच्या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक, कला, क्रीडा तसेच पत्रकारिता तथा वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांना संस्थेच्या वतीने यापूर्वी 'कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे...

 बहिरोळे येथील शनिवार भजन मंडळ यांनी सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात समाजप्रबोधनाचे कौतुकास्पद व उल्लेखनीय कार्य केले आहे, हे भजन मंडळ गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर धार्मिक उत्सवांच्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य याची आशा न करता तालुक्यात गेली १० वर्षे भजन सेवा करीत आहेत. या मंडळामध्ये बुवा - नितिन भातखंडे, पखवाज वादक - राजेंद्र कवळे, सत्यवान मोरे, मितेश पाटील, हार्मोनियम - प्रशांत मायदेव अश्या एकूण २५ जणांचा शनिवार भजन मंडळ आहे. याची दखल उपरोक्त संस्थांनी घेऊन या मंडळाची 'कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२४' साठी निवड केली होती. सातिर्जे येथील ग्रामपंचायतीच्या मैदानात आयोजित कार्यक्रमात शनिवार भजन मंडळ, बहिरोळे यांना 'कुलाबा जीवन गौरव पुरस्कार २०२४' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला, याबद्दल मंडळाचे सर्व स्तरातून कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे...

     या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी शेकापचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषद आमदार जयंत पाटील, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पंडितशेठ पाटील, रा.जि.प. माजी अध्यक्ष आस्वाद (पप्पूशेठ) पाटील, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, गुरुवर्य चांदोरकर सर, शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख नेत्या चित्रलेखाताई पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल थळे, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी चिटणीस प्रविणदादा ठाकुर, काँग्रेस सेवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाषचंद्र गोडसे, मुंबई काँग्रेस कमिटीचे चिटणीस अनंत जाधव, रायगड जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकुर, रायगड जिल्हा परिषदेचे माजी प्रतोद काका ठाकुर, माजी जि.प. सदस्या रविना ठाकुर, माजी जि.प.अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, रायगड काँग्रेस सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश ठाकुर, सातिर्जे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्राची ठाकुर, अलिबाग तालुका काँग्रेस अध्यक्ष भास्करराव चव्हाण, बेलोशी सरपंच कृष्णा भोपी, खिडकी सरपंच वैभव पाटील, मुळे उपसरपंच राकेश पाटील, काँग्रेस नेत्या सुजाता कोळी, मापगाव विभाग काँग्रेस सरचिटणीस विवेक जोशी, सातिर्जे पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सूचित थळे यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते व उमेश ठाकुर मित्रमंडळाचे कार्यकर्ते, तसेच कुलाबा जीवन गौरव पुरस्कार समिती अध्यक्ष श्रीयश घरत व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...  

फोटो लाईन :बहिरोळे येथील शनिवार भजन मंडळ, बहिरोळे यांना 'कुलाबा जीवन गौरव पुरस्कार २०२४' प्रदान करताना माजी आमदार पंडितशेठ पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सुनिल थळे, शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, काँग्रेस सेवा फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुभाषचंद्र गोडसे, काँग्रेस सेवा फाउंडेशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष उमेश ठाकुर, मुंबई काँग्रेस कमिटीचे चिटणीस अनंत जाधव व इतर मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post