रोहा, दि. २० जाने. प्रतिनिधी ;-
देशाचे माजी अर्थमंत्री आणि रोह्याचे सुपुत्र स्व. डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट रोहा व कोएसो डॉ. सी. डी. देशमुख महाविद्यालय रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत बी. के. बिर्ला कॉलेज कल्याणचा यश पाटील हा मानकरी ठरला आहे. महाविद्यालयीन गट फिरता चषक पी.एन.पी. कॉलेज अलिबाग यांच्याकडे गेले आहे...
रोह्याचे सुपुत्र डॉ. सी. डी. देशमुख यांच्या जयंतीनिमित्त संपुर्ण महाराष्ट्रातील महाविद्यालयीन युवकांसाठी गेली 30 वर्षे राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. याउपक्रमाचे संस्थापक अध्यक्ष असलेले नितिन तथा बापू जोशी यांनी ही स्पर्धा सुरू करून राज्यातील तरुणांना एक चांगले व्यासपीठ मिळवून दिले आहे. या स्पर्धेला राज्यभरातून चांगले प्रतिसाद मिळत असते, यंदा या स्पर्धेत राज्यभरातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील ४२ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत यश पाटील प्रथम, कंटक वेदांत दिलिप द्वितीय, पी.एन.पी. कॉलेज अलिबाग, तर तृतीय अमिषा अनिरूद्ध भगत एम.पी.ए.इस.सी. काॅलेज पनवेल व उत्तेजनार्थ केतन दिनेश गुप्ता, शेठ जे.एन.पालीवाला काॅलेज पाली व श्रवण वामन कदम एस.पी. काॅलेज पुणे यांनी पटकावले आहे. वरिष्ठ महाविद्यालयीन गट फिरत्या चषकावर पी.एन.पी. कला आणि वाणिज्य महाविद्यालय अलिबाग यांनी आपले नाव कोरले. तर कनिष्ठ महाविद्यालयीन गट फिरत्या चषक कनिष्ठ महाविद्यालय मेंहेंदळे रोहा यांच्याकडे गेले आहे, स्पर्धेचे परीक्षण डॉ. सोमोशी रविंद्र व भरत चौधरी यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट रोहाचे अध्यक्ष चंद्रकांत पार्टे, कोएसो डॉ. सी. डी. देशमुख व सौ. कुसुमताई ताम्हाणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे, व स्पर्धाप्रमुख प्रा. डॉ. सम्राट अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उभय संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
