अब्दुल सोगावकर - अलिबाग
सोगाव : लक्ष्मी नारायण विद्यामंदिर टाकादेवी - बहिरोळे, अलिबाग शाळेच्या १९९७ - ९८ च्या दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थ्यांनी शनिवार दि.१३ जानेवारी २०२४ रोजी एकत्र येऊन गेट टूगेदर मोठ्या उत्साहात व आनंदाने साजरा केला...
तब्बल २६ वर्षानंतर एकत्र जमलेल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये संतोष थळकर, आदेश कुडेकर, स्वप्निल मोहिते, वैभव घोसाळकर, निलेश नागावकर, जीवन मोरे, किफायत कुर, राजेश घरत, महेश नागावकर, तेजस काठे, जयेश थळे, अब्दुल मुल्ला, आशुतोष घरत, योगेश मापगावकर, अमर घरत उपस्थित होते... तर इतर काही माजी विद्यार्थ्यांना आपल्या व्यस्त कामांमुळे या गेट टूगेदर कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही त्यांनी दूरध्वनीद्वारे या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या...
यावेळी माजी विद्यार्थी महेश नागावकर याचा वाढदिवस असल्याने त्यानिमित्ताने नागावकर याचा वाढदिवस मोठ्या आनंदात व मोठ्या उत्साहात केक कापून सर्व माजी विद्यार्थ्यांनी महेश नागावकर याला केक भरवून शुभेच्छा दिल्या, तसेच नुकतेच महेश नागावकर यांना सर्व प्रकारच्या मूर्त्या घडविणे, पेंटिंग करणे अश्या विविध कलाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ३ जानेवारी २०२४ रोजी 'कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२४' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले...
गेट टूगेदर निमित्ताने थंडीच्या दिवसांत रायगड जिल्ह्यातील सर्वांचे आवडते खाद्य असलेल्या पोपटीचे नियोजन करण्यात आले होते, या पोपटीचा आनंद घेत असताना जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी सर्वांनी एकमेकांना पुढील वाटचालीसाठी निरोगी व आरोग्यदायी, आनंदी जीवनासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या...
फोटो लाईन : लक्ष्मी नारायण विद्यामंदिर बहिरोळे शाळेच्या दहावीच्या १९९७-९८ बॅच च्या माजी विद्यार्थी यांनी एकत्र येऊन गेट टूगेदर साजरा करताना,
