महाराष्ट्र वेदभुमी

आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धा आरसीएफ शाळा ठरली चॅम्पियन



रोहा,दि.१९(विशेष प्रतिनिधी)

डी.इ.एस.अआंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सांगली येथील,श्री कांतीलाल पुरुषोत्तमदास शहा प्रशालेच्या भव्य मैदानावर दि.१२ व १३ जाने.२०२४ रोजी संपन्न झाली... यामध्ये आरसीएफ शाळा चॅम्पियन ठरली आहे...

आरसीएफ शाळेतील १२,१४ व १७ वर्षांखालील मुले व मुली अशा एकूण ३९  खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता...

 यामध्ये १२ वर्षांखालील मुले, यांनी जनरल चॅम्पियनशिप पटकावली तर याच गटातील कु. ध्रुव गणेश जामकर इयत्ता ७ वी याला उत्कृष्ठ खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले...   

शाळेतील विविध गटातून यश प्राप्त केलेले विद्यार्थी 

१२ वर्षा खालील मुले -यामध्ये ध्रुव गणेश जामकर ८० मी. धावणे प्रथम व लांब उडी द्वितीय,आराध्य संजय म्हात्रे ७ वी,८० मी . धावणे तृतीय,

१२ वर्षा खालील मुली- राणी लक्ष्मण ठाकूर ६ वी ६००मी. धावणे प्रथम,

१४ वर्षांखालील मुले- विशाल कौशलेंद्रकुमार सिंग ९ वी ८० मी. हरडल्स प्रथम व उंचउडी द्वितीय,जीत किशोर पाटील ८ वी १०० व २०० मी.धावणे प्रथम,

१४ वर्षा खालील मुली -४x१०० मी. रिले,तृतीय श्रावणी रत्नाकर पाटील ८ वी,पर्णवी अमोल मयेकर ७ वी,चिन्मयी गणेश ओव्हल ८ वी,व शुभ्रा प्रसन्ना कटोर ८ वी,रिया विरेश पाटील ८वी तर

 १७ वर्षा खालील मुले -आर्यन रक्षण राऊत १० वी १००मी. धावणे प्रथम व २००मी. धावणे तृतीय,संगम कैलास कटारे ९ वी लांब उडी  द्वितीय, ४x१०० मी. रिले इ.१० वी प्रथम आर्यन रक्षण राऊत१० वी,विकास रामध्रुव चव्हाण १० वी,चिन्मय राकेश रोकडे १० वी,संगम कैलास कटारे ९ वी,

१७ वर्षा खालील मुली- आर्या सुशील केंदकी ९ वी २०० मी. धावणे तृतीय आदी विद्यार्थ्यांनी सुयश संपादन करून आरसीएफ शाळेसह रायगड जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे...विद्यार्थी वर्गाने मिळविलेल्या या सुयशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post