आरएसएस -भाजपचा राम मंदिराचा उन्माद
बेकारी,बेरोजगारी,महागाई,ईव्हीएम सारे विसरा
राम मंदिर,बाबरी मशिद वादात ६५ हजार पोरे मेली
प्रवीण कोळआपटे - नवी मुंबई
केंद्रातील आरएसएस प्रणित भाजप सरकारने धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे... अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आडून भाजपला देशातील बेकारी,बेरोजगारी ,महागाई ,ईव्हीएम,खाजगीकरण ,पेट्रोल-डिझेलचे वाढते दर ,स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमती आणि त्याची खाल्लेली सबसिडी,भ्रष्टाचार,कोरोना काळातील हिशोब न दिलेला पीएम केअर फंड,जातीय- धार्मिक वाद, मॉब लिचींग,महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारची पाडापाडी, शिवसेना- राष्ट्रवादी पक्ष फोडणे यांसह अनेक मुद्द्यांकडून जनतेचे लक्ष विचलित करायचे आहे... त्यासाठीच आता राममंदिराचा मुद्दा पुढे आणला जात आहे... याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे... राममंदिर उदघाटनाच्या उन्मादात जनता आरएसएस प्रणित भाजप सरकारच्या सर्व चुकांकडे दुर्लक्ष करेल... असा भाजपच्या थिंक टॅंकचा डाव आहे... त्यामुळे पूर्वीसारखेच गोदी मीडियामार्फत इश्यूला नॉन इश्यू आणि नॉन इश्यूला इश्यू करण्याचा प्रयत्न आहे... राममंदिराच्या आडून मोठ्या वोट बँकेला खुश करण्याचा डाव आहे... मात्र ही मोठी वोट बँक म्हणजेच ओबीसी वर्ग भाजपच्या कुटील राजकारणाबाबत संतप्त आहे...कारण अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ट्रस्टवर एकाही ओबीसी व्यक्तीला घेण्यात आलेले नाही... ट्रस्टवर सध्यातरी सर्वच्या सर्व ब्राम्हणवादी आणि एक दलित व्यक्ती आहे... श्रीराम मंदिराचे आंदोलन या देशात ओबीसींनी चालवले... त्याच ओबीसींना आता दूर ढकलण्यात आले आहे...या आंदोलनाचे प्रणेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती , साध्वी ऋतुंबरा,प्रवीण तोगाडिया ,कल्याण सिंग आदी आहेत... या आपल्याच लोकांना भाजपने शेटजी- भटजींचा पक्ष असल्याने बासनात गुंडाळले आहे... लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेमुळेच राम मंदिराच्या आडून भाजपची राजकीय म्हत्वकांक्षा पूर्ण झाली...अडवाणींच्या योगदानानेच भाजप दोन टर्म केंद्रात तसेच इतर राज्यात सत्तास्थानावर आहे...भाजपला सत्तास्थानी आणण्यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचेही मोठे योगदान आहे... मात्र त्याच बाळासाहेबांची शिवसेना त्यांच्या मृत्यूनंतर फोडण्याचे महान काम भाजपने केले... राम मंदिर,बाबरी मशिद वादात ६५ हजार बहुजन समाजाची पोरे मारली गेली... असे शिवशाहीर राजेंद्र कांबळे जाहीरपणे सांगतात... या सर्व गोष्टी विसरता येणार नाहीत... मात्र राममंदिर उदघाटनाच्या उन्मादात जनतेला हे सर्व विसरायला लावण्यात येणार आहे... लोक श्रीरामावर प्रेम,पूजा करतात... हे खरेच आहे...घरात प्रत्येकजण श्रीरामाची पूजा करत असताना वेगळे श्रीराम मंदिर कशाला ? तर याचे उत्तर आहे...भाजपच्या धार्मिक राजकारणाला... देवळे बांधून शेतकरी- बहुजन, ओबीसी समाजाचे कोणतेही प्रश्न सुटत नाहीत...देवळातील पैसा हा शेतकरी- बहुजन, ओबीसी समाजाचा असतो... मात्र त्याच्यावर वेगळाच वर्ग चरत असतो... म्हणून राष्ट्र संत गाडगेबाबा म्हणतात देवळात फक्त पुजाऱ्याचे पोट असते... याबाबत भाजपचे महान प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही मध्यंतरी देवालय नही शौचालय चाहिए... असे म्हणत होते...तेव्हा... लोकहो सावधान भाजपचा डाव ओळखा...
