रोहा, दि. ०४ डिसें. प्रतिनिधी ;-
रोहा येथील नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी १२९ रुग्णांची तपासणी करण्यात आली... त्यापैकी ५५ रुग्णांना आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले... रोहा सिटिझन फोरमने गेल्या दीड वर्षभरात ९१५ नेत्ररुग्णांच्या मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे...
या शिबिरातिल उर्वरित ३० नेत्ररुग्णांची शस्त्रक्रिया मंगळवार व बुधवारी दोन टप्प्यात करण्यात येणार आहेत...शिबिरात अल्पदरात चष्मे वाटपही करण्यात आले...रोहा सिटिझन फोरम सातत्याने 'अंधत्वाकडून दृष्टीकडे' हे मोतीबिंदूमुक्त रोहा अभियान राबवत आहे...रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट मार्फत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते व तपासणी केल्यानंतर एका दिवसात डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केली जात असल्याने गरजूंना दिलासा मिळत आहे...रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या मंदिर सभागृहात शिबीर संपन्न झाले...
शिबिरातिल एकूण ८५ रुग्णांची आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येत आहे...शंकरा आय हॉस्पिटलचे टीम मॅनेजर प्रकाश पाटील, डॉ अश्विन पवार, दिपाली म्हात्रे, नेत्रा महाडीक, हर्षवी शिंदे, रामदास पवार, विश्वनाथ पाटील, आदींनी रुग्णांची तपासणी केली. रोहा सिटिझन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब, निमंत्रक अप्पा देशमुख, मिलिंद अष्टिवकर, महेश सरदार, संदीप सरफळे, श्रीकांत ओक, इल्यास डबीर, दिनेश जाधव, प्रशांत देशमुख, उस्मान रोहेकर, परशुराम चव्हाण, अमोल देशमुख, शैलेश रावकर, सिद्धेश ममाले, दिनेश मोहिते, समिधा अष्टिवकर, रिद्धी बोथरे, बिलाल मोरबेकर आदींनी परिश्रम घेतले...
