शहानवाज मुकादम/रोहा
सारसोली महिला बचत गट, मुंबई मंडळासहीत असंख्य समर्थक शिवसेना शिंदेगटात प्रवेश मनोजकुमार शिंदे.
रोहा: तालुक्यातील चणेरे विभागात सारसोली ग्रामपंचायतच्या सदस्या अपर्णा सानप व तरुण मुंबई मंडळ सारसोली आणि अध्यक्षा योगिता शिर्के महिला बचत गटांनी रविवारी ३५० असंख्य समर्थकांसह (शिंदेगट)शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे...सारसोली ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे...या प्रवेशामुळे सारसोली आणी धोंडखार ग्रा.पंचायतीमध्ये तसेच आता होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत चणेरे विभागात राजकीय समीकरणे बदलणार असे चित्र आता निर्माण झाले आहे...
रोहा तालुक्यात आता शिवसेना (शिंदेगट) पक्षाला संघटनात्मक दृष्ट्या मजबुती व बळकटी मिळणार आहे, सारसोली ग्रामपंचायतवर गेले १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता होती...मात्र या पक्षप्रवेशाने ठिकठिकाणी शिवसेना (शिंदेगट) ची एन्ट्री होऊन आघाडीच्या बालेकिल्ले असलेल्या गावा गावात राजकीय सुरुंग लागण्याची शक्यता आहे...
आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला असुन या पक्ष प्रवेशाने चणेराविभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे...
खांबेरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दगा फटका व विश्वास घात केला होता, या पुढे तटकरेंच्या राष्ट्रवादी पक्षासोबत रोह्यात शिवसेना शिंदेगट काम करणार नाही, उलट आता कोकबण विभागात उद्यापासून ठामपणे उपस्थित राहून कामे सुरु करणार व मोठी सभा घेऊन अम्ही काय करु शकतो हे दाखवून देऊ असे तालुका प्रमुख ॲड मनोजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते...
मात्र या पक्षप्रवेशाने चणेरा मिशन सुरु झाल्याचे चित्र समोर येत असून ॲड मनोजकुमार शिंदे म्हणाले आता चणेरा मिशन सुरु,"ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है"
दि:१७ डिसेंबर ला मिशन चणेरा काय आहे ते जनते समोर दाखवून देऊ...तसेच आशोक सानप यांनी तर ग्रामपंचायत सारसोली ची पोलखोल करीत ते महणाले अम्ही शिंदेगटात पक्षप्रवेश करण्याचे कारण म्हणजे १५ वर्षापासून ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता असुन कोणताही गाव विकास झालेला नाही,गेल्या ५ वर्षांत ग्रामपंचायत करुन ग्रामसभा आयोजित केलेली नसुन प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करुन कागदोपत्रीच दाखवून देत असतील, तसेच ग्रामपंचायतच्या मासिक सभेत एक तास अगोदर सदस्यांना फोनवरून बोलवणा होत असुन सदस्यांना शासनाकडून मिळणारा मानधन ही मिळत नसल्याचे सानप यांनी मोठे आरोप केले आहे...
तरी जिल्हा प्रशासनाकडून या ग्रामपंचायतची दप्तर तपासणी करून कागदोपत्री केलेल्या विकास कामांची प्रत्यक्षात चौकशी करावी,तसेच आम्ही सर्वानीच जो पक्ष प्रवेश केला आहे तो गाव विकासा साठीच,तालुका प्रमुख ॲड मनोजकुमार शिंदे आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्याकडून नक्कीच आमच्या ग्रामपंचायत हद्दीतील गावा गावांचा विकास होईल असा आम्हाला शिवसेना शिंदेगटावर विश्वास आहे असे सानप म्हणाले...
