महाराष्ट्र वेदभुमी

रखडलेला माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाला पण शेतकऱ्याचा मोबदला रखडला.



शहानवाज मुकादम/रोहा

शेतकऱ्यांनी दिला आमरण उपोषणचा इशारा.

 दि:०६/१२/२०२३,

म्हसळा:तालुक्यातील मौजे सकलप स.नं.१९/१ या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता  माणगाव ते डिघी राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण, मात्र जमीन मालकाला कोणताही मोबदला मिळाले नसलेने उपोषणाचा इशारा...

अनेक वर्षांपासून पासून माणगाव ते डिघी राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले होते, सदर रस्त्याचे काम पूर्ण झाले मात्र ज्या शेतकऱ्यांची जागा राष्ट्रीय महामार्गा मध्ये गेली आहे ते जमीन मालक आजही आपले भरपाईची वाट पाहत आहेत...असाच एक प्रकार म्हसळा येथील ज्येष्ठ नागरिक महमद शरीफ हसन हळदे यांच्या सोबत घडला आहे...मौजे सकलप स.नं १९/१ ही जमीन भूसंपादन करण्यात आली होती...

परंतू भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता व जागा मालकाला कोणताही मोबदला न देता माणगाव ते डिघी या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून आज ही जमीन मालक मोबदल्याची वाट पाहत आहेत...

वेळोवेळी संबंधित विभागाकडून जमीन मालक यांनी केलेल्या अर्जाला केराची टोपली दाखवली गेली आहे...अखेर जमीन मालक महमद शरीफ हळदे यांनी आमरण उपोषण करण्याचे ठरविले आहे...

दि: ०५ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी श्रीम. दीपा भोसले यांना लेखी निवेदन देऊन १५ दिवसात योग्य मोबदला मिळावा,अन्यथा उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसणार असा इशारा महमद शरीफ हसन हळदे यांनी दिला आहे...

तसेच सदर विषयी तात्काल दखल घेणे कामी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,नितीनी गडकरी,अदिती तटकरे, कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक रायगड, तहसीलदार म्हसळा यांना ही निवेदन पाठविण्यात येणार आसलेचे हळदे म्हणाले...

Post a Comment

Previous Post Next Post