महाराष्ट्र वेदभुमी

साई सेवक एकविरा मंडळ कोर्लई तर्फे आई एकविरा देवी मंदिर पदयात्रा सोहळ्याचे आयोजन

.


अलिबाग (ओमकार नागावकर)  : 

एकविरा आईचा उदो उदो, आई माऊलीचा उदो उदोचा असा जयघोष करीत साई सेवक एकविरा मंडळ कोर्लई ते एकविरा पालखीसह पदयात्रा दि.०२ डिसेंबर रोजी लोणावळा येथील कार्ला गडाकडे मार्गस्थ झाली...यावेळी मुरुड तालुक्यातील कोर्लई गावातील हजारो एकवीरा देवी भक्तांनी पालखी दर्शनास हजेरी लावली...शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसळ, भाजप उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी ही प्रमुख उपस्थिती दाखवली...

साई सेवक एकविरा मंडळ कोर्लाईचे संस्थापक गजानन पद्माकर पाटील, सायन कोळीवाडा विधानसभा संघटक/संपर्क प्रमुख-मुरुड तालुका, अध्यक्ष अभय पाटील, उपाध्यक्ष मारूती पाटील, खजिनदार जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे या वर्षीही कोर्लई ते श्री क्षेत्र आई एकविरा देवी मंदिर-कार्ला डोंगर येथे पदयात्रा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. २ डिसेंबर सकाळी ८ वाजता कोर्लई , दत्त मंदिर येथून पालखी कार्ला गडाकडे रवाना झाली...


कोर्लई गावातील मानाची पालखी अशी ख्याती असलेल्या या पालखी आयोजनाचे यंदाचे १५वे वर्ष असून या पालखी सोहळ्यात कोर्लईतील अनेक एकविरा देवी भक्तांनी नोंदणी करुन मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने सहभागी झाले आहेत...तर पालखी सोहळ्यावेळी ब्रास बँड वादकांनी पालखीसाठी वादन केले...जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे व चौल ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व भक्तांसाठी अल्पपाहर देण्यात आला...

या पालखी दर्शनास चौलच्या नागरिकांनी देखील हजेरी लावली...१३ डिसेंबर रोजी पालखी कार्ला गडावर पोहोचणार असून सत्यनारायणाची महापूजा करून सांगता समारंभ करण्यात येणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post