महाराष्ट्र वेदभुमी

गोवे गावची आखाडा परंपरा आजही कायम असल्याचा अभिमान :- खा.सुनिल तटकरे

 


कोलाड : विशेष प्रतिनिधी 

सार्वांगिक गावचा विकास करणे हेच प्रमुख ध्येय

 मला.एका गोष्टीचा नेहमीच अभिमान वाटतो की माझ्या गोवे गावाचा आखाडा एके काळी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळापासून चालत आलेला  आखाडा लोप पावत असतांना गोवे गावातील परंपरा माझ्या आजोबांपासुन चालत आलेल्या कार्यक्रमात जेव्हा उत्तम रित्या प्रत्यक्षिका करून हा खेळ उंचावीत आहेत बाजूला गेलेली तरुण पिढी या खेळात आजही एकत्र येत आहेत याचा अभिमान व्यक्त करत आज पर्यंत माझ्याकडून अनेक विकास कमे झाली आहेत व पुढच्या काळात याच पद्धतीने ही कामे केले जातील मग संरक्षण भिंत असो,की इतर काही राहिलेली विकासकामे असतील काही शक्य असतील ते करण्याचा प्रयत्न होईल.मग सामाजिक सभागृह असेल किंवा नवीन गावठाण येथील अंतर्गत रस्ता व इतर ग्रामस्थांनी गावच्या विकासासाठी दिलेले निवेदन आपण बोलत राहा आम्ही करत राहू  गावचा सर्वांगीण विकास करणे हाच मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन रायगडाचे खा.सुनिल तटकरे यांनी गोवे ग्राम पंचायत हद्दीतील गोवे, मुठवली, शिरवली गावातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात केले...

 राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकमेव महिलेला संधी मिळाला ती तुमची सर्वांची लेक व बहीण आहे...तीच्या माध्यमातून लेक लाडकी अभियान महाराष्ट्रात राबविले गेले मुलीचा जन्म झाल्यापासून ती आठरा वर्षाची होईपर्यंत तिला १ लाख ११ हजार रक्कम मिळेल हेच सावित्रीबाई फुले,जोतिबा फुले यांचे स्वप्न आज ही पाहावायस मिळत आहे...या गावातील महिला अध्यक्षा आहेत तसेच विविध बचत गट आहेत त्यांना भारत सरकार मार्फत फिरता निधी अधिकच्या काळात उपलब्ध होईल यामुळे भौतिक  विकास आणि त्यातूनच गावचा सर्वांगीण विकास केला जाणार असल्याचे यावेळी खा. तटकरे म्हणाले...

रोहा तालुक्यातील गोवे ग्राम पंचायत हद्दीतील विविध विकास कामांचे भूमिपूजन खा. सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, नारायण धनवी, बाबुराव बामणे,मनोज शिर्के,वसंत मरवडे, विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव,गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे, उपसरपंच रंजिता जाधव,विभागीय महिला अध्यक्षा तथा ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया जाधव,सदस्य नरेंद्र पवार,नितीन जाधव,भावना कापसे, निशा जवके, अंजली पिंपळकर,सुमित गायकवाड,प्रविण पवार,संजय मांडळुस्कर,ग्रामसेवक शिद,कोलाड खांब परिसरातील असंख्य कार्यकर्ते, गोवे, मुठवली, शिरवली येथील असंख्य ग्रामस्थ तरुण वर्ग, महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते...

प्रसंगी यावेळी गोवे ग्रामपंचायत कर्तव्य दक्ष सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी आपले  मनोगत व्यक्त करतांना सांगितले की साहेब तुमच्या माध्यमातून एक कोटीची संरक्षण भिंत, तिन्ही गावातील अंगणवाड्या, प्राथमिक शाळा, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना,पुर्ण झाले आहे.आज ज्या कार्यक्रमात रस्त्याचे भूमिपूजन झाले.ते मे महिन्यापर्यंत पुर्ण करून त्याचे उदघाटन तुमच्याच हस्ते व्हावे आता मागण्यासारखे काहीच नाही तरीही गोवे गावचा स्मशान भूमीचा रस्ता, मूठवलीचा पाणवठयाकडे जाणारा रस्ता करण्याची मागणी पुर्ण करावी असे निवेदन या कार्यक्रमातून केले...

 सदरच्या या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था रायगड अंतर्गत रा.म.मा. १७  खांब ते शिरवली मुठवली बु.गोवे ते रा.म.मा. १७ रस्ता बांधकाम (लांबी ५.०० कि.मी.)ता. रोहा अंदाजित रक्कम रुपये ४०५.८४ लक्ष या कामाचा भूमी पूजन सोहळा खा.सुनिलजी तटकरे यांच्या शुभेहस्ते करण्यात या प्रसंगी करण्यात आले...

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार मरवडे,यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र पवार यांनी केले तर आभार पांडुरंग जाधव यांनी मानले...

Post a Comment

Previous Post Next Post