कोलाड : प्रतिनिधी रोहण कडू
रोहा तालुक्यातील गोफण येथील रहिवासी असलेले श्री रघुनाथ कडू हे संपूर्ण जिल्ह्यात एक निर्भिड पत्रकार, तथा संपादक म्हणून ओळखले जात आहेत. त्यांनी स्वतःचे "रायगड स्वाभिमान" हे वृत्तपत्र शासकीय कागदोपत्री परवानगीनुसार सुरू केलेले आहे. परंतु रोहा तालुक्यातील निवी येथील समीर बामुगडे याने काही लोकांना व्हॉट्स अप वर मेसेज करून श्री. कडू यांचे वृत्तपत्र हे "फ्रॉड असल्याची अफवा" पसरवून बदनामी केली. याप्रकरणी रोहा पोलीस स्टेशन येथे रघुनाथ कडू यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीसांनी समीर बामुगडे याच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.
श्री. रघुनाथ कडू हे प्रतिष्ठीत संपादक असून अनेक समाजसेवी संघटनांमध्ये ते विविध पदांवर कार्यरत सामाजिक कार्यांमध्ये ते नेहमीच अग्रस्थानी असतात. परंतु त्यांच्याविषयी समीर बामुगडे याने त्यांच्याविषयी खोटे व बदनामीकारक मेसेज व्हाट्स अप वर व्हायरल करून त्यांची बदनामी करून समाजामध्ये त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे कृत्य केले. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
