महाराष्ट्र वेदभुमी

रेवदंड्यात काळभैरव उत्सवानिम्मित इतिहासप्रेमींसाठी शिवकालीन शस्त्र प्रदर्शन



अलिबाग (ओमकार नागावकर) :

रेवदंड्यात काळभैरव उत्सवानिम्मित इतिहासप्रेमींना शिवकालीन ऐतिहासिक शस्त्रे पाहता यावीत या उद्देशाने 'शिव मर्दानी अखाडा साळाव यांच्या तर्फे रेवदंडा हरेश्वर मंदिरात प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते... श्री.काळभैरव मित्र मंडळ व योगेश्वरी महिला संघटना रेवदंडा, अध्यक्ष वैभव चुनेकर, उपाध्यक्ष भगवान तांबडकर, सल्लागार शरद गोंधळी यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे यावर्षी ५६ वे वर्ष असून रेवदंड्यात काळभैरव उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला...

पहिल्यांदाच रेवदंडा काळभैरव उत्सवानिमित्त महाराजांच्या शौर्याची आणि गौरवशाली इतिहासाची माहिती व्हावी, यासाठी हे  प्रदर्शन भरवण्यात आलं होते... त्यात मराठा तलवार, मुघल तलवार, मराठा धोप, सोसनपत्ता, मुघल कट्यार, मराठा कट्यार, कुऱ्हाडी, फारशी, भाले, विठा, पदकुंत, अडकित्ते, पट्टीसा,दगडी तोफगोळे, पोलादी तोफगोळे, कुलपी गोळे, जुल्फिकार, विविध प्रकारच्या ढाली खांजराली आदींचा समावेश होता... रेवदंडा साळावमधले शुभम चवरकर यांनी गेल्या अनेक वर्षांत दुर्मीळ अशी १०० हून अधिक शिवकालीन शस्त्रांचा संग्रह केला आहे... श्री.हरेश्वर मंदिर रेवदंडा आयोजित शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला... आम्ही फक्त पुस्तकात महाराजांबद्दल ऐकल होतं... आज प्रत्यक्षात त्यांची शस्त्र पाहायला मिळाल्याचा खूप आनंद झाल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी यावेळी दिली... तर सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील भव्यदिव्य असे रांगोळी प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले होते...

यावेळी शिवसेना शिंदे गट आमदार महेंद्र दळवी, तालूका प्रमुख अनंत गोंधळी, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, विभाग प्रमुख मारुती भगत, विद्यमान रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्ल मोरे, चौल ग्रामपंचायत उपसरपंच अजित गुरव, राजेंद्र चुनेकर, प्रसाद गोंधळी, प्रवीण राऊत, रेवदंडा पोलीस निरीक्षक अतिग्रे व कर्मचारी, काळभैरव मित्र मंडळ व योगेश्वरी महिला संघटना सर्व पदाधिकारी तसेच सार्वजनिक काळभैरव उत्सव अध्यक्ष वैभव चुनेकर, उपाध्यक्ष भगवान तांबडकर, सल्लागार शरद गोंधळी व पदाधिकारी उपस्थित होते...तालुक्यातील असंख्य भाविकांनी मोठया प्रमाणात दर्शनासाठी रांग लावली होती...

Post a Comment

Previous Post Next Post