महाराष्ट्र वेदभुमी

सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमापत्राची मागणी,जन्माने कर्माने कुणबी असणाऱ्यांना अन्यायकारक:- शंकरराव म्हसकर,

कोलाड (श्याम लोखंडे) 

न्यायासाठी उत्तर रायगड कुणबी समाज लढा उभारणार. येत्या १४ डिसेंबर रोजी मोर्चा 

कुणबी दाखला प्रश्न रायगड जिल्ह्यात शासनाने लादलेल्या जाचक अटींमुळे येथील कुणबी समाज बांधवांना १९६७ चा पुरावा नसल्याने मिळत नाहीत त्यामुळे उत्तर रायगड जिल्ह्यातील ९ तालुक्यात शासनाने कुणबी समाजाचे दाखले अडविण्यात येत आहेत.या समाजातील समाज बांधवांचे कुणबी दाखले देण्यात यावे आम्ही जन्माने कर्माने कुणबी आहोत अशी मागणी शासनाकडे गेली अनेक वर्षापासून कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तसेच ग्रामीण शाखेच्या वतीने केली आहे.तसेच अनेकदा सरकारला याबाबतचे निवेदन अथवा मागणी पत्र देखील दिले आहेत मात्र आजतागायत त्यावर कोणतीही कारवाही शासनाने केली नाही त्यामुळे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमापत्रांची मागणी आम्हीं जन्माने आणि कर्माने कुणबी असलेला उत्तर रायगड कुणबी समाजावर अन्यायकारक ठरत असून यासाठी आता न्यायासाठी उत्तर रायगड कुणबी समाज लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन कुणबी समाज नेते तथा कुणबी उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव म्हसकर यांनी तालुका कुणबी समाज सभेत व्यक्त केले...


कुणबी दाखला प्रश्नांवर रोहा तालुका कुणबी समाजाच्या वतीने शुक्रवारी १ डिसेंबर रोजी माजी आमदार स्व. पा. रा.सानप कुणबी भवन रोहा येथे सभा आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी म्हसकर बोलत होते.राज्यात विविध समाज आपापल्या मागण्यांसाठी आंदोलनाचा चा हत्यार उचलत आहेत जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर मराठा समाज सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी मागणी करत आहेत या मागणीला कोकणातील मूलतः कुणबी असलेल्या समाजाकडून विरोध होत असताना रायगड मधील विशेषतः उत्तर रायगड रोहा तालुक्यासह सुधागड,खालापूर,कर्जत,पेन, पनवेल , अलिबाग, मुरूड, उरण,येथील जन्माने आणि कर्माने असलेला कुणबी समाज आता अधिक आक्रमक होत आहे. त्यामुळे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीला कडकडुन विरोध दर्शवत जरांगे पाटलांची मागणी कुणबी समाज तसेच ओबीसी समाजावर अन्यायकारक आहे... तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचे आवलंबण करा शिका आणि संघटीत व्हा. अनेक कुणबी नेत्यांनी समाजासाठी काम केले आहे त्यामुळे रडण्यापेक्षा लढायला शिका असे मत शंकराव म्हसकर यांनी व्यक्त केले...


कुणबी समाजाच्या प्रश्नासाठी रायगड लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे यांच्या माध्यमातून राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, तातकालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना शासन स्तरावर दोनदा भेट घेऊन कुणबी समाजाच्या जातीच्या दाखल्ासाठी प्रकर्षाने चर्चा झाली...त्यावेळी येथील वंचित कुणबी समाजाला कुणबी दाखला मिळावे या अनुषंगाने मंत्री मोहदय यांनी यावर कार्यवाही करण्यासाठी निर्देश देण्यात आले होते .तरी शासनाच्या अनास्थेमुळे तसेच अधिकारी वर्गाच्या ढकलगाडी कारभारामुळे कुणबी दाखला मिलनेसाठी अडथला निर्माण होत आहे.१९६७ ची अटी व्यतिरिक्त ग्रह चौकशी द्वारा दाखला मिळणे शक्य असल्याचे निदर्शनास येत आहे.. याकरिता सामाजिक दबाव निर्माण करून कुणबी दाखलासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याने कुणबी तरुण एकत्रित येत आक्रमक भूमिका घेत येत्या १४ डिसेंबर रोजी मोर्चा द्वारे आंदोलन नियोजन केले जात आहे...

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहाची सभा तालुका अध्यक्ष शिवराम भाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी कुणबी उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव म्हसकर,कुणबी समाज नेते तथा रायगड जिल्हा ओबीसी समन्वयक सुरेश मगर, तालुका उपाध्यक्ष मारुती खांडेकर, शंकर भगत, गोपीनाथ गंभे, रामचंद्र सपकाळ, शिवराम महाबले,दत्ताराम झोळगे, रायगड युवक अध्यक्ष महेश बमुगडे तालुका अध्यक्ष अनंत थिटे आदी तालुक्यातील धाटाव,कोलाड,खांब, सुतारवाडी,नागोठणे, सोनगाव, मेढा,आरे, चनेरा, भाळगाव, ग्रूप समाज कुणबी समाज बांधव आणि युवक बहुसंख्येने उपस्थित होते...

कुणबी दाखल्यासाठी रोहा कुणबी युवक संघटना आक्रमक येत्या १४ डिसेंबर रोजी रोहा येथे लाक्षणिक आंदोलन.

सदर आयोजित सभेत सुरेश मगर,शिवराम महाबले,दत्ताराम झोलगे, शंकर भगत यांनी मार्गदर्शन केले तर युवक अध्यक्ष अनंत थिटे यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की पूर्वी सारखा आता कुणबी युवक गप्प बसणार नाही कुणबी दाखला प्रश्न हा जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा आहे त्यामुळे त्यामुळे आदी कुणबी दाखला मग बाकी प्रश्न त्यामुळे यासाठी येत्या १४ डिसेंबर रोजी कुणबी दाखल्यासाठी तालुका स्थरावर कुणबी समाज लढा उभारणार असून लक्षवेधी आंदोलन छेडणार असून संबधीत अधिकारी रोहा तहसीलदार,प्रांत,तसेच सामाजिक न्याय विभागाला निवेदन देण्यासाठी जास्तीत जास्त कुणबी समाज बांधव यांनी आयोजीत आंदलोनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post