महाराष्ट्र वेदभुमी

गोरेगांव नगरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

*गोरेगांव नगरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन*

माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर

माणगाव तालुक्यातील गोरेगाव हे गाव ऐतिहासिक आहे.गोरेगांव नगरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज आहे. दि.०५ डिसेंबर २०२३ रोजी भैरवनाथाची जयंती असते त्या निमित्ताने गोरेगाव वतनदार व ग्रामस्थ,श्री भैरवनाथ मित्र मंडळ व श्री भैरवनाथ महीला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भैरवनाथ मंदिरा मधे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ०९:०० वाजता श्री दत्त मंदिर ते श्री भैरवनाथ महाराज मंदिर मुखवटा यात्रा,सकाळी ११:०० वाजता श्री भैरवनाथ महाराज अभिषेक व विधिवत पूजा,दुपारी १२:३० वाजता श्री भैरवनाथ,भवानी आणि जोगेश्वरी मातेचे नविन मुखवटे देवावर अर्पण करणे,दुपारी १२:३० वाजता श्री भैरवनाथ महाराज जन्मोत्सव, दुपारी ०१:०० वाजता सत्यनारायणाची महापूजा व तीर्थ प्रसाद, सायंकाळी ०७:३० वा.श्री भैरवनाथ महाराज महाआरती,रात्री ०९:०० वाजता श्री कृष्ण प्रासादिक भजन मंडळ,कुंभार आळी,गोरेगाव यांचे भजन असे;विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भक्तांनी कार्यक्रमात सहभाग घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post