महाराष्ट्र वेदभुमी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांना आकर्षक टी-शर्ट वाटप



माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर

निष्ठावंत शिवसैनिकांना टी-शर्ट वितरणाचा कार्यक्रम वाशी, नवीमुंबई मध्यवर्ती कार्यालय जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या हस्ते 

दि.२४/१०/२०२३ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दरवर्षी साजरा होत असतो...या भव्य दिव्य दसरा मेळावा करीता आकर्षक असे टी-शर्ट बनवण्यात आले आहेत...निष्ठावंत शिवसैनिकांना टी-शर्ट वितरणाचा कार्यक्रम वाशी, नवीमुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या हस्ते वितरीत व वाटपाचा कार्यक्रम दि. २१/१०/२०२३ रोजी पार पडला...

त्याप्रसंगी वाशी विभागाचे उपशहर प्रमुख संदीप पवार,श्रीवर्धन मतदार संघ वाळवटी गण सहसंघटक महेश सुर्वे,तळा तालुका युवासेना सोशल मीडिया समन्वयक देव दुर्गावले श्रीवर्धन मधील पदाधिकारी,नवीमुंबई स्थित शिवसैनिक, युवासैनिक पदाधिकारी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post