महाराष्ट्र वेदभुमी

थेट सरपंच निवडीने ग्रामपंचायत निवडणुकीत वाढली चुरस...



 रोहा / शहानवाज मुकादम

कोकबण, न्हावे, चणेरा, खांबेरे अशा ४ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये चुरस..

रोहा : चणेरा विभागातील कोकबण, न्हावे, चणेरा, खांबेरे अशा  ४ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीमध्ये चुरस...नागरिकांमधून थेट सरपंच निवड आणि शासनाकडून मिळत असलेला थेट निधी यामुळे चणेरा विभागातील ग्रामपंचायत निवडणुका चुरशीने होत आहेत...या निवडणुकित गावचा कल कळणार असल्याने अगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरणार आहे... सर्वच राजकीय पक्षाचे नेते सक्रिय झाले आहेत... दिवाळीपूर्वी ४ ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये  फटाक्याची आतिषबाजी व गुलाल उधळला जाणार आहे...

प्रत्येक नेत्याकडे असलेल्या दुसर्‍या फळीतील नेते सध्या कोणतीही सत्ता अथवा पद नसल्याने अस्वस्थ

जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका अनिश्‍चित काळासाठी लांबणीवर पडल्या आहेत...यामुळे प्रत्येक नेत्याकडे असलेल्या दुसर्‍या फळीतील नेते सध्या कोणतीही सत्ता अथवा पद नसल्याने अस्वस्थ आहे...त्यात ग्रामपंचायतीसाठी १५ व्या वित्त आयोगाकडून थेट मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असल्याने गावच्या सरपंचाला जिल्हा परिषद अथवा  पंचायत समिती सदस्यापेक्षा अधिक आर्थिक अधिकार मिळाले आहेत..

सदस्यामधून सरपंच निवड होण्याऐवजी थेट जनतेतून सरपंच निवड होणार 

यावेळी सदस्यामधून सरपंच निवड होण्याऐवजी थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्यानेही गावात वर्चस्व कोणाचे हेही या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे... गावचा कल समजण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुक ही चाचणी मानली जात आहे... विधानसभेसाठी आणि जिल्हा परिषदेसाठी इच्छुक असलेल्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे...

उमेदवारी माघारीची मुदत २५ ऑक्टो, मतदान ५ नोव्हेंबर तर मतमोजणी व निकाल होणार ६ नोव्हेंबर

सोमवार पासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले असून उमेदवारी माघारीची मुदत २५ ऑक्टोबरपर्यंत आहे... यानंतर मतदान ५ नोव्हेंबर रोजी तर मतमोजणी व निकाल ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे...यामुळे गावचे पारकट्टे आणि देवळाच्या ओसर्‍या निवडणुकीच्या चर्चेत रात्री उशिरापर्यंत जागत्या राहत आहेत... तर नेत्यांच्या बैठकामधून उमेदवारांची चाचपणी सुरू असून रूसवे-फुगवे काढत असतानादेखील दिसुन येते...

Post a Comment

Previous Post Next Post