महाराष्ट्र वेदभुमी

जिजामाता माध्यमिक विद्यालय, कोंझर येथे वह्या वाटप


महाड विशेष प्रतिनिधी 

सकल मराठा सेवाभावी संस्था महाड यांना शारदोत्सवाच्या दुसऱ्या पुष्पाचा आरतीचा मान 

 रायगड शिक्षण प्रसारक मंडळ, महाडच्या जिजामाता माध्यमिक विद्यालय, कोंझर येथे सोमवार दिनांक १७/१०/२०२३ शारदोत्सवाच्या दुसऱ्या पुष्पाचा आरतीचा मान सकल मराठा सेवाभावी संस्था, महाड यांना देण्यात आला...या संस्थेच्या पदाधीकार्यांच्या हस्ते आरती घेण्यात आली... 

विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम मुख्याध्यापक,शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे सहकार्य 

शारदोत्सवाच्या निमित्ताने या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला...कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले...शाळेचे मुख्याध्यापक श्री डिगे सर यांनी आपल्या  प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला... यावेळी सकल मराठा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व संस्थापक श्री महेंद्र धामणसे, कोकण युवा अध्यक्ष श्री रोहित गोविलकर, संस्थेचे जिल्हा अध्यक्ष व शाळेचे माजी विद्यार्थी श्री  गणेश पवार (सांदोशी), संस्थेचे सचिव,शाळेचे माजी विद्यार्थी श्री हरीश पवार(सांदोशी) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले...शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री विन्हेरकर सर यांनी आपल्या शिक्षक मनोगतात संस्थेने केलेल्या विविध कामांविषयी माहिती दिली... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जंगम सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री मोटे सर यांनी केले...कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले...

Post a Comment

Previous Post Next Post