महाराष्ट्र वेदभुमी

खामगाव ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार...ग्रामपंचायत हद्दीतील जलजीवन मिशन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे




माणगाव प्रतिनिधी(सिकंदर आंबोणकर)

१,६१,१२,९२८ रू.केंद्र सरकारी जलजीवन मिशन योजनेचे खामगाव हद्दीत काम निकृष्ट दर्जाचे

दि.१९/१०/२०२३ मु.पो.खामगाव ता. म्हसळा जि.रायगड हद्दीमध्ये जलजीवन मिशन (हर घर नल) या योजनेचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचे चालू आहे...१,६१,१२,९२८ रू.ची ही केंद्र सरकारची नळपाणी योजना आहे...ह्या योजनेचा लाभ खामगाव मुळगाव, मोहल्ला,रोहिदास नगर, बौद्धवाडी असा पंचक्रोशीसाठी ७४ हजार लिटरची साठवणं टाकी व ७ कि.मि.अंतराची प्लॅस्टिक पाईप लाईन मु.वांगणी येथील विहिरीवरून म्हसळा- गोरेगाव रस्त्याच्या बाजूने ४ इंच व्यासाच्या पाईप लाईन साठवणं टाकीपर्यंत आणले जाणार आहेत...पण ते पाईप कमीत कमी ३ फूट जमिनीच्या आतमध्ये गाडले गेले पाहिजेत पण ते काही ठिकाणी जमिनीच्या वरच निदर्शनास येते आहेत... 



ठेकेदाराला विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे 

७४ हजार लिटर साठवणं टाकीचे काम ही फार निकृष्ट दर्जाचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे...साठवण टाकीच्या कामात कुठेही सु-सूत्रता दिसून येत नाही तसेच प्रत्यक्ष ठिकाणी कोणत्या आणि किती ग्रेडचा सिमेंट वापर केला जातो, वाळू कोणत्या प्रतीची वापरली जाते तसेच स्टील आणि एम एम बारचे वापर किती वापरायचे,आर.सी.सी. कन्सल्टंट कोण आहे? यासंबंधीत व इतर प्रकारचा माहिती फलक कुठेही निदर्शनास येत नाही...साठवण टाकीच्या प्लिंत लेव्हल मध्येही कुठे सातत्यता दिसून येत नाही...सदर सगळ्या गोष्टी ठेकेदाराला विचारणा केली असता त्याच्याकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळत आहेत...

सामाजिक व मुंबई मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी यांची भेट घेऊन ठेकेदाराचा प्रकार केला उघड

सदर विषयाला सामाजिक कार्यकर्ते राकेश वाघरे, निलेश वाघरे व त्यांचे सहकारी परेश खडस, प्रमोद निंबरे, सिजाऊद्दीन जोगीलकर, नासिर जोगीलकर तसेच मुंबई मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी म्हसळा यांची भेट घेऊन ठेकेदाराचा सर्व प्रकार उघडकीस आणला... व प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी यांनी भेट देऊन चालू असलेलं काम थांबवून तोडण्याचे आदेश दिले...व त्या ठिकाणी नवीन २ साठवणं टाक्या बांधून देण्याचे ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मान्य केले...


प्रकल्पाची साठवण टाकी बांधलीच नाही..पत्र्याला पन्हळी लावून पाईपच्या साहाय्याने जमिनीवर सोडले पाणी

तसेच खामगाव ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगच ठेकेद्वारामार्फत रीतसर निविदा काढुन काम केलं गेलं पण त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते वाघरे बंधूनी पाहणी केली असता असे निदर्शनास आले की त्या प्रकल्पाची साठवण टाकीच बांधली गेलेली नाही... फक्त पत्र्याला पन्हळी लावून ते पाणी पाईपच्या साहाय्याने जमिनीवरच सोडण्यास आले आहे...अशा प्रकारचे खामगाव ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झाला असून त्याला जबाबदार हे खामगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत असा आरोप वाघरे बंधुंनी केला...

दोषींवर अपहाराचा गुन्हा दाखल करून ठेकेदारांना काळया यादीत टाकुन कायदेशीर कारवाईची मागणी 

सदर झालेल्या कामांची सखोल चौकशी करून दोषींवर अपहाराचा गुन्हा दाखल करावा,ठेकेदारांना काळया यादीत टाकावे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी...अन्यथा खामगाव पंचक्रोशीमधून मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडले जाईल...अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते वाघरे बंधू तसेच ग्रामस्थ मंडळ,मुंबईकर मंडळींनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली...

Post a Comment

Previous Post Next Post