कोलाड- रोहा प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
कोलाड पोलीस ठाणे येथे मोबाईल चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात सर्वत्र कौतुक
रोहा तालुक्यातील कोलाड पोलीस ठाणे गु.र.नं. ६०/२०२३ भा.द.वि.कलम ३८०, ४५४, ४५७ व ७६/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हे दाखल असून कोलाड नाका येथे न्यू टाइम सेन्टर मोबाईल शॉपी या दुकानातुन तसेच स्मार्ट फोटो स्टुडिओ आणि मोबाईल शॉप या दुकानातून मोबाईल चोरीबाबत सदर गुन्हे अज्ञात आरोपी विरोधात दाखल करण्यात आले होते..मागील काही दिवसांपूर्वी कोलाड नाक्यावरील चोरीचे प्रकार उघडकीस आले...गेली अनेक दिवस मोबाईल चोरीवरील चोरी प्रकरणातील गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक कार्यालय, यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जनसंपर्क अधिकारी अलिबाग यांच्यावतीने युद्ध पातळीवर सुरू होते...त्या तपासाअंतर्गत चोरट्याचा तपास लागताच शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या आणि अधिक तपासासाठी कोलाड पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सर्वत्र कौतुक होत आहे..
गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या डेव्हिड कलेश्वर मिंज याच्या मुसक्या चौकशीत नमूद दोन्ही गुन्हे केल्याची दिली कबुली
सदर दोन्ही गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता... सदर गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून डेव्हिड कलेश्वर मिंज, वयवर्ष २६ , रा. पुईगाव, कोलाड, जि. रायगड याच्यावर चांगलीच पालथ ठेवत त्यास गुन्हे अन्वेषण विभागाने त्याच्या मुसक्या आवळून यास सदर गुन्ह्याकामी ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने नमूद दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे...सदर आरोपीताकडून वरील दोन्ही गुन्ह्यात चोरी गेलेले विविध कंपनीचे एकूण २९ मोबाईल, २ लॅपटॉप व एक स्पीकर तसेच सदर गुन्हे करताना वापरलेली मोटारसायकल असा एकूण ३,१९,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे...सदर आरोपीस पुढील कारवाई करणे करता कोलाड पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले आहे...
उत्कृष्ट कामगिरी केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय,रायगड-अलिबाग.यांच्याकडून मिळाली
सदरची कामगिरी मा.श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड, मा.श्री. अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक रायगड, स्थानिक गुन्हे शाखेचे, पोनि/श्री.बाळासाहेब खाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक/श्री. धनाजी साठे, पोहवा / जितेंद्र चव्हाण, पोना/विशाल आवळे, पोशि/अक्षय सावंत, मपोशि/जयश्री पळसकर, सायबर शाखेचे पोना/तुषार घरत, पोशि/अक्षय पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली असल्याची माहिती जन संपर्क अधिकारी पोलीस अधीक्षक कार्यालय, रायगड अलिबाग यांच्याकडून मिळाली आहे...
