पुगाव-रोहा ( नंदकुमार कळमकर)
सुधागड तालुक्यातील उसर येथील ग्रामदेवता श्री वरदायनी देवी ही भक्तांच्या हाकेला धावणारी माता...उसर गावापासून दोन किमी अंतरावर निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या श्री वरदायनी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी चारही बाजूनी रस्ता.. सुधागड तालुक्यातून मढाळी, झाप, आपटवणे, भावसेत येथून तर रोहा तालुक्यातून सुकेळी, खांब, वैजनाथ, विठ्ठलवाडी, राजखलाटी येथून जाण्यासाठी रस्ता आहे...
या परिसरातील नागरिक नोकरी निमित्ताने मुंबई, ठाणे, पुणे येथे जात असतात परंतु देवीचा आशिर्वाद घेण्यासाठी मात्र आवर्जून वरदायनी मातेच्या मंदिरात येतात...कारण सर्व संकट हरणारी,तारणारी देवी वरदायनी...अशी लोकांची श्रद्धा आहे.. पूर्वी उसर गावाजवळच गावठाण होता...आणि तेथे आगरी समाजातील लोक वास्तव्याला होते...तेच देवीची पुजा अर्चा करीत... परंपरपासून चालत असलेल्या अदयाप ही संतोष भगत व भगत कुटूंबीय देवीची पुजा करतात...
निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या मंदिरात साती आसरा, कनाई देवी, भैरी देवी, गणपती, मारुती, शंकराची पिंड,नंदी अशा मुर्ती पहावयास मिळतात...मंदिराच्या पायथ्याला कोंडी नावाचा झरा असुन हा झरा भुयारी मार्गातून राबगाव येथील तांबट डोहात व सुकेळी कडे जाणारा पाण्याचा झरा असुन हे पाणी वरदायनी देवीच्या कृपेने बाराही महिने सुरु असते... याच पाण्याचा सुकेळी येथे मोठा धबधबा आहे..तसेच येथून पूर्वी पाली येथे पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन होती ती पाईप लाईन जीर्ण झाल्यामुळे बंद आहे...

