महाराष्ट्र वेदभुमी

शेकडो कार्यकर्त्यांनसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात दिवा भाजपचे माजी अध्यक्ष रोहिदास मुंडेंचा जाहीर प्रवेश


माणगाव प्रतिनिधी (सिकंदर आंबोणकर)

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह रोहिदास मुंडे यांचा पक्षप्रवेश

दिवा भाजपचे माजी अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी शनिवार दि.२१/१०/२०२३ उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला... यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, लोकसभा संपर्क प्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख सदानंद थरवल यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते...रोहिदास मुंडे त्यांच्यासह सौ.राजश्री मुंडे, कल्पिता मुंडे, विकास इंगळे, नागेश पवार, प्रशांत आंबोणकर, मूर्ती मुंडे, शनिदास पाटील, संजय जाधव, बैद्यनाथ पाडी, अक्षय वनगुळे, सागर पवार, सुधीर घाडीगांवकर, उत्तम सिंग, सचिन विश्वकर्मा, यांच्यासह दिव्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला...

मुंडे यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने दिव्यात शिंदें विरुद्ध ठाकरें शिवसेना संघर्ष

रोहिदास मुंडे हे दिव्याच्या प्रश्नावर कायमच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राहिले आहेत... भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी दिव्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच अडचणीत आणण्याचे काम केले होते...आता मुंडे यांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने दिव्यात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता आहे...

Post a Comment

Previous Post Next Post