तांबे एज्युकेशन सोसायटीचे सुशीलाताई पवार माध्यमिक विद्यालय भाले सॅनेटरी नॅपकिन वेडींग मशीन वाटप
तांबे एज्युकेशन सोसायटीचे सुशीलाताई पवार माध्यमिक विद्यालय भाले, तालुका माणगाव या माध्यमिक विद्यालयाला लायन्स क्लब ऑफ कोलाड रोहाच्या वतीने सामजिक बांधिलकीतून विद्यालयाला सॅनेटरी नॅपकिन वेडींग मशीन वाटप करण्यात आली...प्रसंगी यावेळी कोलाड लायन्स क्लबचे अध्यक्ष नरेश बिरगावाले,उपाध्यक्ष डॉ विनोद गांधी,डॉ श्याम भाऊ लोखंडे,बोर्ड ऑफ डायरेक्टर अलंकार खांडेकर, रविंद्र लोखंडे,सौ शोभा खांडेकर, पुजा लोखंडे,विश्वास निकम, नंदू कळमकर, राजेंद्र कप्पु दिनकर सानप,महेश तुपकर, विठ्ठल सावळे,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रचना राम कळमकर सहाय्यक शिक्षक विलास शिरसे, नितीन उभारे , मनोज भोईर, सौ अनिता शिंपी, लिपिक कुमार निखिल धनावडे,कर्मचारी प्रशांत यादव,जयदास नटे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा-सौ अस्मिता चाळके, उपाध्यक्षा- सौ दीक्षा दिनेश उमासरे ,शिक्षक पालक संघ उपाध्यक्षा- सौ प्रीती यादव, शिक्षणप्रेमी दत्ताराम खांबे, गणेश पवार, भीम धाडवे, माजी अध्यक्ष भागाराम मंचेकर, महीला पालक -कीर्ती माळी,श्वेता जाधव ,सौ.सपना बाईत,सौ.श्वेता भऊड,सौ.शमिका मोरे, सुनिता जाधव,सह लायन्स क्लब कोलाड चे पदाधिकारी आदी शाळेतील विद्यार्थी शिक्षक,आजी माजी विद्यार्थीनीं ,महीला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते...
कोलाड लायन्स क्लब यांच्या वतीने तसेच लायन अलंकार खांडेकर व सौ शोभा खांडेकर यांच्या विशेष सहकार्य
गेली तीन वर्ष कोलाड विभाग ग्रामीण भागात सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, आरोग्य, वैद्यकीय,तसेच विविध उपक्रम राबविले जातात असल्याने यावेळी कोलाड लायन्स क्लब यांच्या वतीने तसेच लायन अलंकार खांडेकर व सौ शोभा खांडेकर यांच्या विशेष सहकार्याने या विद्यालयाला सॅनेटरी नॅपकिन वेंडींग मशीन याप्रसंगी शालेय वर्गाला वाटप करण्यात आली...उत्स्फर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या तसेच आयोजीत कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत लाभलेले कोलाड येथिल कॅन्सर तज्ञ डॉ सचिन मिस्त्री यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक, पालक वर्गाला कॅन्सर आजाराला घाबरून न जाता त्यावर मात करायला शिका त्याच बरोबर आहार वेळेवर करा आहारात आवश्य पाले भाज्याचा आधीक वापर करा तसेच व्यसनापासून दूर राहणे योग्य आहे याकरिता विडी, सिगारेट, दारू ,तंबाखू , गुटखा, म्हशेरी, यामुले अधिक या आजारांची लक्षणे असतात तर वरील आजारांवर यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच डॉ विनोद गांधी डॉ श्याम भाऊ लोखंडे,सौ शोभा खांडेकर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कळमकर मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले...
लायन्स क्लबचे रविंद्र लोखंडे यांनी केले सूत्रसंचालन शिक्षक मनोज भोईर यांनी आभार मानून कार्यक्रमाची केली सांगता
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन इश्र्ववस्तन स्वागतगीताने करण्यात आली... उपस्थीत मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कळमकर मॅडम यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लबचे रविंद्र लोखंडे यांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षक मनोज भोईर यांनी करत आभार मानून या कार्यक्रमाचा सांगता करण्यात आली...
