खांब - कोलाड ( श्याम लोखंडे / नंदकुमार कळमकर )
लायन्स क्लबचे मार्गदर्शक रविंद्र घरत संस्थापक अध्यक्ष डॉ सागर सानप यांचे मार्गदर्शन
रोहा तालुक्यातील संभे येथे कोलाड लायन्स क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात बुधवारी शंभरहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली... त्यापैकी २८ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत..लायन्स क्लब ऑफ इंटनॅशनल डिस्ट्रिक ३२३१ ए ४ यांच्या प्रेरणेने कोलाड विभाग परिसरात सामाजिक बांधिलकीतून गेली तीन वर्षे विविध उपक्रम राबवत असलेल्या कोलाड लायन्स क्लबच्यावतीने तालुक्यातील संभे येथे बुधवारी ४ ऑक्टोर रोजी लायन्स क्लब कोलाड व लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ विनोद गांधी नर्सिंग होम कोलाड व वीर हनुमान मित्र मंडळ ग्रामस्थ व महीला मंडळ संभे यांच्या सहकार्याने लायन्स क्लबचे मार्गदर्शक रविंद्र घरत संस्थापक अध्यक्ष डॉ सागर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच क्लबचे अध्यक्ष नरेश बिरगावले यांच्या अध्यक्षतेखाली मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते...याला येथील रुग्णांनी भरभरून प्रतिसाद दिला असून यात शंभरहून अधिक जणांची तपासणी करण्यात आली असून २८ रुग्णांवर लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे...
डॉ गांधी नर्सिंग होम येथे विशेष तज्ञांच्या वतीने रुग्णांच्या डोळ्यांची अल्पदरात तपासणी
कोलाड लायन्स क्लबच्या वतीने गेल्या वर्षभरात तीनशेहून अधिक नेत्ररुग्णांच्या मोफत आणि यशस्वी शस्त्रक्रिया लायन्स हेल्थ फाऊंडेशन अलिबाग येथे करण्यात येत असून तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या क्लबच्या शिबिरात कमालीची वाढली आहे..तर कोलाड येथील दर बुधवारी क्लब च्या अधिपत्याखाली डॉ गांधी नर्सिंग होम येथे विशेष तज्ञांच्या वतीने रुग्णांच्या डोळ्यांच्या तपासणी अल्पदरात या सेंटरवर केल्या जातात तसेच अल्पदरात चस्मे दिले जातात अशी सुविधा येथील ग्रामीण भागातील रूग्णांना देण्याचे कार्य गेली एक वर्षापासून या क्लबच्या वतीने केले जात आहे...
लायन्स हेल्थ फाऊंडेशन,वीर हनुमान मित्र मंडळ तसेच संभे ग्रामस्थ व रुग्ण बहुसंख्येने उपस्थित
सदरच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात यावेळी कोलाड लायन्स क्लबचे अध्यक्ष नरेश बिरगावले,उपाध्यक्ष डॉ मंगेश सानप,डॉ विनोद गांधी, डॉ श्याम भाऊ लोखंडे, खजिनदार नंदकुमार कळमकर,बोर्ड ऑफ डायरेक्टर रविंद्र लोखंडे, राजेंदर कोप्पू , विश्र्वास निकम,विठ्ठल सावळे, दिनकर सानप, अलंकार खांडेकर,सौ शोभा खांडेकर,सौ पुजा लोखंडे,आदी लायन मेंबर तसेच माजी उपसरपंच संजय सानप,दिवाण शेठ सानप, पांडुरंग सानप,पोलिस पाटील अनंत सानप, लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे डॉ श्वेता दळवी, प्रतीक कानासे, सुजित पाटील,सानिया म्हात्रे, डॉ गांधी नर्सिंग होम सपना पथालॉजी येथील नर्स नूतन जाईलकर,सोनल टवले,आदी वीर हनुमान मित्र मंडळ तसेच संभे ग्रामस्थ व रुग्ण बहुसंख्येने उपस्थित होते...
गांधी जयंती सप्ताह म्हणून ऑक्टोबर विक सर्व्हिस साजरा केला जात
१ ते ८ ऑक्टोबर दरम्यान क्लबच्या वतीने गांधी जयंती सप्ताह म्हणून ऑक्टोबर विक सर्व्हिस साजरा केला जात असून या दरम्यान सामजिक, शैक्षणीक, आरोग्य, वैद्यकीय, स्वच्छ्ता अभियान,तसेच विविध उपक्रम या क्लबच्या वतीने राबविण्यात येतात.. या अनुषंगाने हे नेत्र तपासणी शिबिर संभे येथे आयोजित करण्यात आले...असल्याचे क्लबचे अध्यक्ष नरेश बिरगावले यांनी सांगितले...

