दिनांक ४/१०/२०२३महाड विशेष प्रतिनिधी
कोतूर्डे येथे शैक्षणिक साहित्य वाटप
रोटरी क्लब ठाणे यांचे मानले मनःपुर्वक आभार
.रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थेएंड यांच्या माध्यामातून सकल मराठा सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कोतूर्डे येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले...
यावेळी सकल मराठा सेवाभावी संस्था चे संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे, कोकण अध्यक्ष श्री कल्पेश म्हस्के,महाराष्ट्र प्रदेश युवा उपाध्यक्ष श्री कमलेश पवार, कोकण युवा अध्यक्ष श्री रोहीत गोविलकर, गावाचे उपसरपंच श्री संतोष खेडेकर, शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर, कांबळे मॅडम आदी उपस्थित होते...यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आपल्या भाषणात त्यांनी रोटरी क्लबचे प्रेसिडेंट श्री श्याम मदिवले साहेब व डॉ.श्री संजीव धामणसे साहेब यांनी केलेले सहकार्य हे खूप मोलाचे आहे...त्यानी केलेल्या सहकार्य मुळे संघटनेला एक नवीन काम करण्याची उर्जा मिळते.असे त्यानी आपले मनोगत व्यक्त करत रोटरी क्लब ठाणे यांचे मनःपुर्वक आभार मानले ..
