कोलाड प्रतिनिधी:(श्याम लोखंडे / नंदकुमार कळमकर)
रविवारी २२ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न
रोहा तालुक्यातील स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेचा वर्षपुर्ती सोहळा आणि गडपुजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला... सेवा निवृत्त सैनिक निलेशजी दिसले यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी २२ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न करण्यात आला...गडाची ग्रामदेवता आई अन्साई देवी, गडावरील देवदेवता, तसेच महाद्वारावर तोरण बांधून गडाचं पुजन करण्यात आले... त्याच बरोबर गड संवर्धन मोहिमेला लागणारे अवजार तसेच शास्त्रांचे पूजन या प्रसंगी करण्यात आले... यावेळी परम पवित्र भगवा ध्वज फडकविण्यात आला... तसेच गडाची माता आई अन्साई आई भवानी मातेची आराधना करत भंडाऱ्याची उधळण करत शिव छत्रपती शिवरायांचे जय घोष करत या सोहळ्यात लाठीकाठी खेळ सादर करूण सुरगडाच्या शिलेदारांनी या प्रसंगी जल्लोष केला...
एका वर्षात गड संवर्धनाच्या तब्बल २४ मोहिम
२३ ऑक्टो २०२२ रोजी किल्ले सुरगडाच्या रहाळ परीसरातील तरूणांना अजयजी भोसले यांनी एकत्रित करून आई अन्साईच्या आशिर्वादाने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर किल्ले सुरगडाच्या अविरत गडसंवर्धनाची मुहूर्तमेढ रोवली... आई अन्साई देवीच्या कृपा आशिर्वादाने स्थानिक तरूण एकवटले आणि स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेची स्थापना करण्यात आली...स्थानिक तरूणांचा सहभाग पाहता या संस्थेने किल्ले सुरगडाच्या अविरत संवर्धनासाठी जोर धरला...आणि एका वर्षात गड संवर्धनाच्या तब्बल २४ मोहिम करत गडावर जाण्याचा पायरी मार्ग त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची गैरसोय पाहता पाच टाकी समुहातील पाचही टाक्यांमधील गाळ साफ करून त्या पुर्णपणे स्वच्छ करण्यात स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेला यश आले... याच टाक्यांमधे सुरगडाच्या शिलेदारांना दोन तोफा आणि दगडी शिवकालीन तोफगोळे त्याचबरोबर शिवकालीन शिला दगडीवस्तू मिळाल्या... त्या आजही आपल्याला त्या वस्तू गडावर सुस्थितीत पहावयास मिळतात...किल्ले सुरगडावर चालत असलेल्या या अविरत शिवकार्याची दखल किल्ले सुरगडाच्या घेऱ्यातील लायन्स क्लब कोलाड - रोहा या सामाजिक संस्थेने घेतली, आणि या गडसंवर्धन कार्यास पुर्णपणे पाठींबा देत गडसंवर्धन उपयोगी वस्तू देऊन सुरगडाच्या शिलेदारांचा त्यांनी यथोचित सन्मान केला... गडाच्या घेऱ्यातील सामाजिक, राजकिय त्याचबरोबर गडाच्या पायथ्याजवळील गावांमधील पोलिस पाटील, ग्रामस्थ, महिलावर्गांनी सुद्धा या गडसंवर्धन कार्यात त्यांचा पाठींबा दर्शविला...
लाठीकाठी खेळ सादर करणारी टीम,किल्ले गडपाल महेंद्रजी पार्टे,भरतजी महाडीकसह गडप्रेमी उपस्थिती
आज या वर्षपुर्ती सोहळ्यात सुरगडाच्या शिलेदारांसोबत गडाच्या घेऱ्यात असणाऱ्या गावातील प्रत्येकाने सहभाग नोंदवला होता.... आजच्या या कार्यक्रमासाठी सेवा निवृत्त सैनिक निलेशजी दिसले, वन्यजीवरक्षक सामाजिक संस्थेचे सागरजी दहिंबेकर, लायन्स क्लब कोलाड कमिटीचे उपाध्यक्ष डॉ शामभाऊ लोखंडे, सेक्रेटरी अनिल महाडिक, खजिनदार नंदकुमार कळमकर, बोर्ड ऑफ डायरेक्टर रविंद्र लोखंडे व टीम, तसेच आदिवासी समाजातील आमच्या खांद्याला खांदा लावून गडसंवर्धन करणारी मधुकर जाधव यांची टीम त्याचबरोबर आई अन्साई देवीची नित्य पुजा करणारे सुरेशजी पार्टे, कु. धीरजजी येरूणकर यांची लाठीकाठी खेळ सादर करणारी टीम, किल्ले सुरगडाचे गडपाल महेंद्रजी पार्टे, त्याचबरोबर गडप्रेमी भरतजी महाडीक यांच्या सह बहुसंख्येने गडप्रेमी यांची उपस्थिती होती...
सुरगडाच्या शिलेदारांचे शब्दसुमनाने आभार व्यक्त करत या सुवर्ण सोहळ्याची सांगता
या सोहळ्या दरम्यान आई अन्साई देवीची पुजा करण्याचा मधुकरजी पार्टे आणि किशोरजी सावरकर या दांपत्यास मिळाला... पुरोहित म्हणून विशेषतः गजाननस्वामी जंगम यांनी उत्तमरित्या धार्मिक आणि आध्यात्मिक विधिवत पद्धतीने देवीची आणि गडाची पुजा केली... स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या सर्व शिलेदारांना या किल्ले सुरगडाच्या अविरत संवर्धनासाठी बळ दे, आई देवी माते या सर्व गडसंवर्धन करणाऱ्या शिलेदारांवर कृपादृष्टी राहू दे कोणतीही काम करत असताना त्याचे रक्षण कर हि सदिच्छा पुरोहित यांनी आई अन्साई मातेजवळ यावेळी केली... उत्सुर्त प्रतिसाद लाभलेल्या या वर्षपुर्ती सोहळ्याचे समालोचन कु. निलेश जाधव याने केले...त्यानंतर माजी सैनिक श्री. निलेशजी दिसले सरांनी त्यांच मनोगत व्यक्त करत सुरगडाच्या शिलेदारांच्या कार्याला सलाम करत सर्वातोपरी मदत करण्याचे सांगितले... त्यानंतर श्री. सागर दहिंबेकर यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त करून संवर्धन कार्यात लागणाऱ्या उपयोगी वस्तू त्यांच्या वन्यजीवरक्षक संस्थेकडून मदतीसाठी देण्याचे आपलं मत मांडलं... कार्यक्रमाच्या शेवटी आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे, ग्रामस्थांचे, महिलांचे आणि सुरगडाच्या शिलेदारांचे शब्दसुमनाने आभार व्यक्त करत या सुवर्ण सोहळ्याची सांगता केली...

