कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
रुग्णांना जीवदान मिळत असल्याचे प्रतिपादन महिला व बाल कल्याण विकासमंत्री ना.कु.अदिती तटकरे यांनी केले...
रायगड जिल्ह्याचा विस्तार अधिकच मोठा असल्याने जिल्ह्यातून विविध राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्ग जातात त्यात अनेक जड अवजड वाहनांची मोठी वाहतूक त्यामुळे अपघाताच्या प्रमाण वाढले असल्याचे समजते अशा वेळी नागरिकांना '१०८'ची सेवा खूपच जीवनदायी ठरत आहे... जिल्ह्यात '१०८'च्या 'एएलएस' व 'बीएलएस' या प्रकारातील रुग्णवाहिका आहेत...या रुग्णवाहिकेमार्फत चोवीस तास सेवा दिली जाते...रुग्णवाहिकांमध्ये चालकासोबतच डॉक्टर असल्यामुळे रुग्णांना त्वरित उपचार सुरू करून त्यास रुग्णालयात दाखल करण्यात येते... त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळत असल्याचे प्रतिपादन महिला व बाल कल्याण विकासमंत्री ना. कु.अदिती तटकरे यांनी केले...
२३ अंब्युलन्स कार्यरत असून दसऱ्याच्या निमित्ताने २४ तास रूग्णांना सेवा देणारी १० च्या तीन रुग्णवाहिकेचे पूजन
रायगड जिल्ह्यात विना मूल्य सेवा देणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील १०८ नंबर च्या अंब्युलन्स कार्यरत आहेत सन २०१४ पासून जिल्ह्यात एकूण २३ अंब्युलन्स कार्यरत असून दसऱ्याच्या निमित्ताने भारतीय संस्कृती म्हणून लोक अवजार तसेच विविध शस्त्रांची पुजा करतात त्या अनुषंगाने सेवेतील २४ तास रूग्णांना सेवा देणारी १०८ च्या तीन रुग्णवाहिकेचे पूजन ना.अदिती तटकरे यांनी स्वतः सुतारवाडी येथील गीताबाग निवासस्थानी केले यावेळी मंत्री तटकरे बोलत होत्या...अत्यावशयक सेवेत २४ तास सेवा देणाऱ्या १०८ रुग्णवाहिनीचे पूजन ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कांचन बिडवे (आहेर) उपजिल्हा व्यवस्थापक, अजय जगताप, डॉ सुनील अधागले,डॉ नागे,डॉ संघर्ष, डॉ राजेश पांडे, डॉ रश्मी हुगे,धर्मा झेंडे, स्वप्नील बाकाडे, सतीश जाधव, विनोद सलागरे,आदी १०८ सेवेवर कार्यरत असलेले डॉक्टर आणि चालक उपस्थित पुढे म्हणाल्या की भारतीय संस्कृतीत साडे तीन मुहर्तापैकी एक समजला जाणारा दसऱ्याचा मुहर्त आहे आणि या दसऱ्यानिमित्त आपण या दिवशी विविध शस्त्रांची व साधनांची पूजा करतो, त्याच पार्श्वभमीवर १०८ रुग्णवाहिका ही जीवरक्षक आहे... त्यानिमित्त १०८ रुग्णवाहिकेचे पूजन केले असल्याचे प्रतिपादन केले...
ना.अदिती ताई तटकरे व रोहा,अलिबाग मुरुडचे आ.महेन्द्र दळवी यांच्या हस्ते रोहा व मुरूड येथे यारुग्णवाहिका पूजन
जिल्ह्यात २०१४ पासून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या १०८ रुग्णवाहिका २३ कार्यरत असून मंत्री अदिती ताई तटकरे व रोहा,अलिबाग- मुरुडचे आमदार महेन्द्र दळवी यांच्या हस्ते रोहा व मुरूड येथे या रुग्णवाहिका यांची पूजा करण्यात आली तसेच अपघातानंतर पहिल्या सूवर्ण तासामध्ये जखमींना वैद्यकीय मदत पोहोचवून त्यांच्यासाठी जीवनवाहिनी ठरलेल्या आपत्कालीन १०८ च्या सेवेने अनेकांना वैद्यकीय मदत मिळवून दिली आहे. यात हृदयविकाराचे रुग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेकांचा समावेश असल्याने दसऱ्यानिमित्त डॉक्टर आणि चालक यांनी १०८ रुग्णवाहिकेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले...यावेळी १०८ रुग्णवाहिकेेच्या जिल्हातील सर्व टीम बहुसंख्येने उपस्थित होते...
अशी केली जाते मदत रुग्ण अथवा इतर कोणाकडून '१०८' क्रमांकावर कॉल केल्यास तो क्रमांक कुठला,ते शोधले जाते...'जीपीएस'च्या मदतीने त्या भागात कोणते रुग्णालय आहे, हे पाहून तेथील ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली जाते...त्यानंतर रुग्णवाहिका रुग्णापर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचेल, याकडे लक्ष दिले जाते.दरम्यान, अपघातग्रस्त किंवा आपत्कालीन स्थिती असल्यास नातेवाइक रुग्णाला डॉक्टर उपचारकरत जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकतात, अशी माहिती '१०८' रुग्णवाहिकेच्या जिल्हा व्यवस्थापक कांचन बिडवे(आहेर) यांनी या प्रसंगी दिली...

