प्रतिनिधी माणगाव सिकंदर आंबोणकर
खेळाडूंना टेनिस क्रिकेटमध्ये भव्य दिव्य प्लॅॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने माणगाव प्रीमियर लीग स्थापन
माणगाव तालुक्यातील होतकरू खेळाडूंना टेनिस क्रिकेटमध्ये भव्य दिव्य प्लॅॅटफॉर्म मिळावा या उद्देशाने ऍडव्होकेट राजीव साबळे लीगचे संस्थापक, संतोष खडतर आणी दिपक जाधव लीग चे कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेली लीग म्हणजेच माणगाव प्रीमियर लीग या लीग ने यावर्षी तिसऱ्या पर्वात पदार्पण करत असताना ३२ संघाची निवड करण्यात आली आहॆ...यावर्षी या लीगच्या अध्यक्षपदी संतोष दसवते यांची निवड करण्यात आली आहॆ...
प्रथम पारितोषिक एक लाख असणार असून तब्बल आठ पारितोषिके आणि विशेष बक्षिसे देण्यात येणार
यावर्षी देखील मागील वर्षापेक्षा भव्य दिव्य असे आयोजन करण्यात येईल असे माणगाव प्रीमियर लीगच्या कमेटीकडून सांगण्यात आले आहॆ तसेच या लीगमध्ये एकूण ४१७ खेळाडूंचे दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी लिलाव प्रक्रिये द्वारे संघात निवड करण्यात येणार आहॆ...त्यानंतर मोर्बा रोड माणगाव येथील अल्ताफदादा धनसे यांच्या धनसे मैदानावर दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी लीगचे उदघाट्न होऊन अंतिम दिवस दिनांक १० डिसेंबर २०२३ असणार आहॆ...तरी लीगचे प्रथम पारितोषिक हे १ लाखाचे असणार असून तब्बल ८ पारितोषिके आणी इतर विशेष बक्षिसे देण्यात येणार आहेत...
लीगसाठी लीगचे माजी अध्यक्ष श्री. निलेश केसरकर आदींचे विशेष सहकार्य लाभणार आहॆ.
या लीगसाठी लीगचे माजी अध्यक्ष श्री. निलेश केसरकर तसेच मंगू जाधव,राहुल बक्कम,सागर पाशीळकर,वैभव टेंबे, रोहित रातवडकर, निलेश उभारे,नंदू वाढवळ,वैष्णव साठे,केदार जाधव, महेश पोवार,मुकुल मेहता,फहद करबेलकर,समीर महाडिक यांचे विशेष सहकार्य लाभणार आहॆ..
