महाराष्ट्र वेदभुमी

जवानांची आठवण न ठेवणं हे वैचारिक अध:पतन -अनघा मोडक



नवीन पनवेल प्रतिनिधी ;-

जवानांना तिरंगा म्हणजे आयुष्य नांवाच्या काठीवर जन्म, जगणं आणि मृत्यू चक्राकार स्वतःचं अस्तित्व लहरत ठेवणं

एकंदरीत जवानांची आठवण न ठेवणं, त्यांना अपमानास्पद वागणूक देणं हे भारतीयांचे वैचारिक अध:पतन असल्याचं मत ख्यातनाम निवेदिका अनघा मोडक यांनी नवीन पनवेल मधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात काढले‌ ...येथील आचार्य अत्रे कट्ट्यातर्फे रविवार २९/१०/२३ रोजी आयोजित शूरां मी वंदिले या सर्वांसाठी विनामूल्य असलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या...जवानांना तिरंगा म्हणजे आयुष्य नांवाच्या काठीवर जन्म, जगणं आणि मृत्यू चक्राकार फिरत ठेवून स्वतःचं अस्तित्व लहरत ठेवणं आहे...आज सीमेवर पहारा देत आपल्या सुरक्षेचं तेज ते ख-या अर्थाने वाढवत असल्यानं आपण निश्चिंत जगत आहोत...तरी देखील आज भारतात जवानांना तितकासा मान दिला जात नाही ‌ज्या ज्या वेळेस आपणांस जवानांचं विस्मरण होतं त्यावेळेस ते शहीद होत असतात आणि म्हणून जरा याद करो कुर्बानी असं कवीला सांगावंसं वाटतं...असं मत त्यांनी पुढे व्यक्त केलं...

स्वातंत्र्योत्तर काळात स्वातंत्र्य टिकवून ठेवणं जास्त कठीण होत आहे कारण विवेक, बुद्धी, विचार व सद् भावनेवरील भारतीयांची पकड ढिली पडत चालली आहे...असं प्रतिपादन करून सैन्यातील शिस्तीविषयी त्या म्हणाल्या ,अपयश कसं पचवायचं याचं शिक्षण त्यांना दिलं जातं...सैनिक ही वृत्ती असून शिस्तीच्या प्रवृत्तीतून त्यांना निर्व्याज प्रेम, समता, सद् भावना यातून सामान्य माणसापेक्षा अभिमानानं व्यापक कसं जगायचं हे शिक्षण मिळाल्याने ते सामान्य जनांपेक्षा समाधानाने कर्तव्य पूर्ण जीवन जगत असतात...यामुळेच ते इतरांपेक्षा उजवे ठरतात म्हणूनच त्यांच्या अस्तित्वाला सलाम....

त्यांच्या शिस्तीविषयी युवकांमध्ये गोडी निर्माण करायची तर बालवयातच वॉटर पार्क सारख्या ठिकाणी सहली न नेता एन्.डी.ए.,सैनिक शाळा, लष्करी प्रदर्शने अशा ठिकाणी सहली नेण्याचे आवाहन अनघा मोडक यांनी केले...

Post a Comment

Previous Post Next Post