शहानवाज मुकादम/रोहा
ग्रामपंचायत निवडणुकीत खुर्ची खेचीचा प्रकार
तालुक्यातील एकूण १२ ग्रामपंचायत निवडणुका ०५/ नोव्हेंबर रोजी असुन मतमोजणी व निकाल ०६/ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार...चणेरा विभागातील ४ ग्रामपंचायतीचे निवडणुका असुन यामध्ये खांबेरे, चणेरे, न्हावे, कोकबण आशा ग्रामपंचायतींचा समावेश आहे...स्थानिक राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहे...
ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मजबूत करण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे..त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत रस घेतला आहे...निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच सरपंच आणि सदस्य पदासाठी कोणते उमेदवार सरस ठरू शकतात हे पहावयास मिळणार आहे...
थेट सरपंच निवडीने ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस वाढली असून खुर्ची खेचीचा प्रकार दिसुन येत आहे...ग्रामपंचायतची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढविली जात नसली तरी स्थानिक स्तरावर पॅनल तयार करून या निवडणुका राजकीय पक्षांच्या नेतृत्वाथेट सरपंच निवडीनेत लढविल्या जातात...त्यातच सरपंचाची निवड ही थेट जनतेतून करण्यात येणार आहे... त्यामुळे या निवडणुकीला अधिक महत्त्व आले आहे...निवडणुका जाहीर झाल्यानंतर ग्रामीण भागातील राजकारण तापले असून गावातील चावडीवर आता निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत...
निवडणुक म्हटले की, स्थानिक पातळीवर दुरंगी किवा तिरंगी लढत व काही ठिकाणी सर्व पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणुक रिंगणात उभे करून सत्तेसाठी व मतांसाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडवून मतदारांना आकर्षित करून आपले राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच मतदान होईपर्यंत केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा असते...
निवडणुक निकाल लागल्यानंतर किमान पाच वर्ष मतदारांकडे कोण किती लक्ष देते हे सर्वश्रुत आहे... याचेच उदाहरण स्थानिक आमदार खासदार असुन याची साक्ष चणेरा ते बिरवाडी-खैरे खुर्द,तळवडे ते चांडगाव आणि गडबड ते न्हावे रस्त्याची दुर्दशा,तरुणांची बेरोजगारी आणि महागाई आशा अनेक समस्यांवर कोणी लोक प्रतिनिधी बोलण्यास तयार नाही...
थेट सरपंच पदासाठी मतदारांचा कल विचारात घेऊन उमेदवाराची निवड व वेळप्रसंगी अपक्षांची आघाडी करुन निवडणुक रिंगणात उभे राहणारे,भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे, जनतेच्या हिताचे कार्य करणारे आणि विकास कामांवर भर देणारा उमेदवार असावा अशी प्राथमिक पातळीवर चर्चा सुरु झाली आहे...त्यामुळे एकाच पॅनेलला पॅनलप्रमुख म्हणतील तसे मतदान करावे हा नेहमीचा पारंपारिक दृष्टीकोन असला तरी सुज्ञ व जागरूक मतदार निवडणुक चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच वेगवेगळया बाबींचा विचार करून त्याचे आतापासून समीक्षण करण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसुन येते...
