महाराष्ट्र वेदभुमी

सौ. सोनाली रेवणे यांना सकल मराठा सेवाभावी संस्थातर्फे समाजभूषण पुरस्कार


महाड विशेष प्रतिनिधी 

 मराठा सेवाभावी संस्था तर्फे समाजभूषण पुरस्कार 

सकल मराठा सेवाभावी संस्था हि सामाजिक संघटना समाजा मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा नेहमीच सन्मान करत असतें... अशाच समाजामध्ये काम करणाऱ्या संघटना यांना नेहमीच मदतीचा हात पुढे करून समाजामध्ये चांगल्या काम करणाऱ्या सौ. सोनाली रेवणे यांना सकल मराठा सेवाभावी संस्था तर्फे समाजभूषण पुरस्कार प्रदान संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री मनोज धामणसे यांच्या हस्ते करण्यात आले... 

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे,महिला मंडळ व आदी पदाधिकारी उपस्थित

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री महेंद्र धामणसे,महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष श्री शिवाजी दरेकर, कोकण युवा अध्यक्ष श्री रोहीत गोविलकर, नियोजन समिती अध्यक्ष श्री नविन परमार, कोकण विभाग कार्याध्यक्ष श्री निलेश तळवटकर, जिल्हा अध्यक्ष श्री गणेश पवार, तालुका संपर्क प्रमुख श्री अरुण सर्कले, महिला मंडळ व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post