कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे ) :
गौरीं गणपती उत्सवानंतर पुन्हा गणेश भक्तांना वेध साखर चौथ गणपती उत्सवाचे
गौरीं गणपती उत्सवानंतर पुन्हा गणेश भक्तांना वेध साखर चौथ गणपती उत्सवाचे लागले असून कोलाड विभागात व कोलाड पोलीस ठाणे सिद्धिविनायक हद्दीत येथील ग्रामस्थ व विविध युवक मंडळ एकत्रित येऊन रविवारी दिनांक २ ऑक्टोबर रोजी संकष्टी चतुर्थी निमित्ताने साखर चौथीचे खाजगी घरगुती १९ व सार्वजनिक १२ गणेश मूर्तींची स्थापना करत सिंहासनावर विराजमान करत मोठ्या उत्साह मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात साजरा होत असतांना कोलाड विभाग आणि परीसरात दिसत आहे...
गेली अनेक वर्षे या कोलाड विभागात विविध ठीक ठिकाणी साखर चौथ गणपती उत्सव
रविवारी कोलाड विभागात उत्सवा ठिकाणी दीड दिवसांचे गणपती बाप्पांचे वाजत गाजत साखर चौथ गणपती बाप्पांचे आगमन करत मोठ्या भक्ती भावाने व आनंददायी वातावरणात सिंहासनावर विराजमान केले आहेत... गेली अनेक वर्षे या विभागात विविध ठीक ठिकाणी साखर चौथ गणपती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो...
कोलाड विभाग परिसर व कोलाड पोलीस ठाणे हद्दीत साखर चौथ गणपती उत्सवात एकूण ३१ बाप्पांचे आगमन
त्यामुळे गौरी गणपती उत्सव काळानंतर साखर चौथ गणपती उत्सव हा काही गावात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात कोलाड विभाग परिसरात व कोलाड पोलीस ठाणे हद्दीत साखर चौथ गणपती उत्सवात एकूण ३१ गणपती बाप्पांचे आगमन आज रविवारी होत ठीक ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येत असून यात १९ सार्वजनिक व १२ खाजगी घरगुती गणेश मूर्तींची स्थापना करत हा उत्सव कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करत साजरा केला जात असल्याची माहिती कोलाड पोलीस उप निरीक्षक अजित साबळे यांनी दिली आहे.

