महाराष्ट्र वेदभुमी

पावसाअभावी भातशेती कोरडी, बळीराजा धास्तवला, हवामान खात्याच्या अंदाजानुसार कमी पाऊस असल्याने चिंतेत वाढ.





कोलाड प्रतिनिधी:(श्याम लोखंडे )
पावसाने दमदार सुरवात करत बळीराजाला सुगीचे दिवस दाखवले...मात्र अचानक पावसाने दडी मारल्याने भातशेती कोरडी 

जून महिन्यातच पावसाने उशिराने सुरवात केली...तदनंतर  मेघराजने उत्तम अशी  सुरवात करताच बळीराजा सुखावला... शेतकऱ्यांनी खरिपाच्या पिकासाठी आपल्या शेतीची मशागत करून तो पेरणीसाठी मेघाराजाच्या प्रतीक्षेत असतानाच पावसाने दमदार सुरवात करत बळीराजाला सुगीचे दिवस दाखवले...चांगली पेरणी झाली रोपटे लागवडीस आले उत्तमरीत्या भात लागवडीसाठी सुरवात करत लागवड करून दोन महिने उलटले चांगली शेती भरली...मात्र गेली आठ ते दहा दिवस अचानक पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या भात लागवडीस तसेच शेतात पाणी नसल्याने व पावसाच्या अभावामुळे संपुर्ण भातशेती कोरडी पडली असून बळीराजा धास्तवत असल्याचे दिसून येत असून तो चिंताग्रस्त झाला आहे...

पावसाने विश्रांती घेतल्याने लावलेले पीक पावसाअभावी कोरडे पडल्याने बळिराजा सापडला संकटात  

सुरवातीपासूनच हवामान खात्याने पाऊस  असल्याचा अंदाज व्यक्त केला होता... तर जून महिन्याअखेर दमदार पावसाची सुरवात तर जुलै महिना उजाडताच पावसाची दांडी तद्नंतर अतिवृष्टी करत पुर परीस्थिती निर्माण केल्याने काही शेतकऱ्यांची तर अक्षरशः लागवडीसाठी उखडून ठेवलेले रोप हे वाहून गेले...तर जे काही तरले त्या रोपांची लागवड केली...मात्र पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने शेतात लावलेले पीक हे पावसाअभावी कोरडे पडल्याने बळिराजा चांगलाच संकटात सापडला आहे...इतिहासात रायगड हे भात कोठार म्हणून ओळखले जाते..रायगड सह कोकणात भात पिकावर जगणारे असंख्ये शेतकरी आहेत...गेली आठ ते दहा अधिक  दिवसंपासून पावसाने मारलेल्या दांडीमुळे बळीराजा धास्तवला आहे...

हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज दर्शवल्याने शेतकऱ्यांची अधिक चिंतेत वाढ

तर दुसरीकडे हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज दर्शवला असल्याने शेतकऱ्यांची अधिक चिंता वाढल्याचे दिसून येत आहे...त्यामुळे लागवड केलेल्या रोपटे पाण्याच्या अभावामुळे सुकून गेले तर जमिनीला भेगा देखील पडल्याचे दिसून येत आहे... शेतात पाण्याची कमतरता भासत असल्याने शेत जमीन कोरडी पडल्याने सुखण्याची चिन्हे तसेच भाताची डौलाने उभे असलेले रोपटे हे पाण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे...

हवामान खात्याचा अंदाज आता ठरतोय खरा... 

पावसाळ्यातील दिवसातदेखील कडकडीत ऊन जून महिना सरता जुलै महिन्यातमधला फलित पाऊस ऑगस्टमध्ये कमी  पडला तर तद्नंतर गायब झाला आहे...त्यावर पाऊस कमीच असल्याने हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला...त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा यंदा कमीच पाऊस पडला आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे...भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेला हवामान खात्याचा अंदाज आता खरा ठरतो आहे... 

जुलै ऑगस्ट महिन्यात जोरदार होणारा पाऊस हाच खरा बळीराजाच्या भात शेती करता उपयुक्त ठरत असतो रोपटांची वेळेवर केलेली लागवड त्यावर त्यांनी दिलेला खतांचा मात्रा यावर शेती त्या पाण्यावर फुलून येते मात्र ऑगस्टच्या मागच्या पंधवरड्यात पावसानी दांडी मारल्याने भातशेती सुकली तर पाण्याअभावी जमिनीला भेगा पडल्या आहेत... त्यामुळे शेतकऱ्यांचा अधिक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही...



Post a Comment

Previous Post Next Post