श्याम लोखंडे रोहा रायगड
उंच उंच दही हंडया फोडणाऱ्या गोविंदपथकांना पाहायला रोगात तुफान गर्दी
रोहा दि. ०७ सप्टें. प्रतिनिधी:- रोहयात पारंपारिक पध्दतीने गोकुळाष्टमीचा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला....पावसाने गेली काही दिवस दडी मारली होती... गुरुवारी सकाळपासून रोहयात हलका पाऊस सुरू झाला, पावसाने हजेरी लावत गोविंदा पथकांमध्ये जान आणली... यामुळे हा पारंपारिक सण अतिशय आनंदात साजरा झाला... शहरातील विविध प्रमुख आळयांमधुन निघणारे गोविंदा पथके दुपारनंतर एकामागुन एक रोहा बाजारपेठेकडे येत येथिल उंच उंच दही हंडया फोडतात. हा विलोभनिय क्षण आपल्या नजरेत टिपण्यासाठी रोहा अष्टमीकरांनी बाजार पेठेत एकच गर्दी केलेली होती...
तालुक्यात जवळपास १२४ दहिहंडयांचे आयोजन करण्यात आले होतेे...
पावसाने दडी मारल्याने गोविंदला पाऊस नाही असे चित्र निर्माण झाले होते...परंतु सकाळी पावसाने रिपरिप सुरू करताच गोविंदा पथकांमध्ये ऊर्जा संचारली गेली, तालुक्यात जवळपास १२४ दहिहंडयांचे आयोजन करण्यात आले होतेे... त्यामध्ये रोहा शहरात सायंकाळी होत असलेली आमदार अनिकेत तटकरे मित्रमंडळाची दहीहंडी स्पर्धा, राममारुती चौकातील शिवसेना ठाकरे गटाची दहीहंडी आणि यंदा शहर भाजपाने रोशन चाफेकर यांच्या माध्यमातून तीनबत्ती नाका येथे आयोजित केलेली दहीहंडी या उत्सवाचे आकर्षण होत्या... ग्रामीण भागासह रोहा अष्टमी शहरातील विविध आळयांमधुन गोविंदोत्सव साजरा केला जातो... दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान गावातील प्रथेपरंपरे प्रमाणे साईनाथ मित्र मंडळ मोरे आळी, त्यानंतर जय गिरोबा अंधार आळी व रोहयाचा राजा धनगर आळी ही गोविंदा पथके त्यांत्या आळीतील ज्येष्ट नागरीकांच्या मार्गदर्शनाखाली शिस्तबध्दतेने एकामागुन एक असे येत बाजार पेठेतील विविध ठिकाणी बांधलेल्या दहीहंडया फोडुन या उत्सवाचा आनंद लुटला... गौरोबा नगर दमखाडी येथिल गोविंदा पथक आणी महात्मा फुले नगर येथिल संत रोहिदास गोविंदा पथक यांनी मुख्य हमरस्त्यावरील तीन बत्ती नाका पोलिस चौकीपर्यंत येत यादरम्यान बांधण्यात आलेल्या विविध दहीहंडया फोडुन गोविंदोत्सव साजरा केला...पावसाची हजेरीने गोविंदा पथकांचा उत्साहा वाढिस लागला होता... तीन बत्ती नाका येथुन पुढे नदीकडे जात हे गोविंदा पथके विसर्जित करण्यात आली... रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता...

