श्याम लोखंडे कोलाड रायगड.
वंशवलीच्या दस्तएवजा ऐवजी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी
सर्व मराठा समाजाने सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.. मात्र वंशवलीच्या दस्तएवजा ऐवजी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे...अशी छोटीशी सुधारणा सरकारने आदेशात करावी अशी मागणी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे.. या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत केली आहे...
आदेशात सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी सुधारणा
सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण जोपर्यंत आदेशात सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी सुधारणा होत नाही तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे...आमच्या कडे वंशावळ नाही तसेच कित्येकांकडे पुरावे नाहीत...त्यामुळे सरकारने तेव्हढी सुधारणा करावी अशी मागणी जरांगे यांनी केली आहे...
