महाराष्ट्र वेदभुमी

रोहा धाटाव क्रीडा संकुलात रंगला कुस्तीचा थरार...शालेय क्रिडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग



कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे ) 

कुस्ती स्पर्धेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद विविध विद्यालयातील एकूण ५५ स्पर्धक १० शाळा स्पर्धेत सहभागी

जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मान्यतेने रोहा तालुक्यात पावासाळी शालेय क्रीडा स्पर्धाना सुरुवात झाली आहे...या पार्श्वूमीवर धाटाव क्रीडा संकुलात नुकत्याच कुस्ती स्पर्धा पार पडल्या...तसेच सदरच्या कुस्ती स्पर्धेला विद्यार्थ्यानी भरभरून प्रतिसाद दिला....यावेळी धाटाव ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोकराव मोरे, सकल मराठा समाज रोहा तालुका अध्यक्ष आप्पा देशमुख यांच्या हस्ते नाणेफेक उडवून या स्पर्धला प्रारंभ करण्यात आले...विविध विद्यालयातील एकूण ५५ स्पर्धक या स्पर्धेत आपले नशीब आजमावण्यासाठी उतरले होते... रोहा तालुक्यातील एकूण १० शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या..या स्पर्धेसाठी पंच म्हणून गीता द. तटकरे महाविद्यालयाचे शिक्षक गोविंद कवलगे, ग्रेगोरियन पब्लिक स्कुल किल्ला येथील क्रीडा शिक्षक सुधीर जंगम यांनी काम पाहिले.. .तर यावर्षी धाटाव संकुलात रंगलेला कुस्तीचा थरार विद्यार्थी क्रिडा रशिक तसेच उपस्थिताना पहायला मिळाला...यावेळी उपसरपंच अशोकराव मोरे, सकल मराठा समाज रोहा तालुका अध्यक्ष आप्पा देशमुख, पोलीस हवालदार धायगुडे, तालुका क्रीडा समन्वयक रविंद्र कान्हेकर, क्रीडा शिक्षक सुधीर जंगम, गोविंद कवलगे, सानेगाव विद्यानिकेतनचे भोईर सर, भरत गुरव, मंगेश कुर्ले, धाटाव क्रीडा संकुलचे क्रीडा मार्गदर्शक अमित दळवी, शिक्षक, पालक सह आदी सहभागी खेळाडू विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते...

मागील वर्षी शालेय जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक आलेला अनुज योगेश ठाकूरचा गौरव 

सानेगाव विद्यानिकेतन शाळेचे विद्यार्थी मागील वर्षी शालेय जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक आलेला अनुज योगेश ठाकूर या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला... तसेच यावर्षी एम. पी. एस. एस कोलाड शाळेने चांगले यश मिळविले... तालुकास्तर शालेय स्पर्धेत ग्रेगोरियन पब्लिक स्कुल, एम. डी. एन फ्युचर स्कुल कोलाड, एम. पी. एस. एस कोलाड, सानेगाव विद्यानिकेतन सानेगाव, एम. बी.पाटील वरसे या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता...

Post a Comment

Previous Post Next Post