महाराष्ट्र वेदभुमी

तळा येथे रानभाज्या महोत्सव उत्साहात साजरा.




तळा प्रतिनिधी:(नंदिनी भोसले) 

आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती

तळा येथे रानभाज्या महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला....आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पामार्फत पोषण महिना समारंभाचे औचित्य साधून तळा तालुक्यातील शेतकरी व महिलांसाठी शहरातील गणेश मंगल कार्यालय येथे तालुकास्तरीय पौष्टिक तृणधान्य व रानभाजी पाककला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते..या कार्यक्रमासाठी कोकण विभागाचे विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांनी अवर्जून उपस्थिती लावली होती...

तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित

या कार्यक्रमात तालुक्यातील बहुतांश महिलांनी सहभाग घेऊन विविध प्रकारचे पदार्थ प्रदर्शनासाठी ठेवले होते...तसेच उपस्थित मान्यवरांना या विविध पदार्थांची माहिती दिली... या कार्यक्रमाप्रसंगी तळा तहसिलदार स्वाती पाटील,गटविकास अधिकारी कुलदिप बॉंगे, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे,बाल विकास प्रकल्प अधिकारी दिपाली शेळके,मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे नगरपंचायतीच्या सर्व नगरसेविका, नगरसेवक व तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post