महाराष्ट्र वेदभुमी

विघ्नहर्ताच्या उत्सव सणाला निघालेल्या गणपती भक्तांवर खड्ड्यांचे आणि वाहतूक कोंडीचे मोठे विघ्न चाकरमान्यांच्या जीव मुठीत


कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे) 

पळस्पे व माणगाव मध्ये जाम, जिथेतिथे वाहतूक कोंडी ; वाहतूक व्यवस्थेचा उडाला पुरता बोजवारा!

सरकारच्या हलगर्जीपणाचा झाला कळस... मनुबुद्धी गोठलेल्या सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका मात्र मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे चाकरमान्यांच्या प्रवासात खड्ड्यांचे विघ्न निर्माण झाले असून गणपती सणासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात यातना सहन कराव्या लागत आहेत...पळस्पे, कोलाड,व माणगावमध्ये जामच जाम, तर जिथेतिथे वाहतूक कोंडी आणि वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले... गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील एका लेंथचे खड्डे बुझविले जातील अशाप्रकारचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते...परंतू प्रत्यक्षात गणेशोत्सवास प्रारंभ होऊनदेखील प्रशासनाने आपले आश्वासन पुर्ण केले नसल्याने समस्त चाकरमान्यांकडून प्रशासनाच्या या नाकर्तेपणाबद्दल प्रचंड संतापाची भावना व्यक्त होताना दिसत आहे...

खड्ड्यांमुळे संभाव्य अपघाताचा धोकाही मोठा असल्याने चाकरमानी अक्षरशः जीव मुठीत घेऊन  करतात प्रवास

शनिवार व रविवार हक्काची सुट्टी असल्याने एकाचवेळी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची संख्या वाढल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याचे दिसून येत होते.. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासात अनेक विघ्ने निर्माण झाल्याने प्रवासीवर्गाचे चांगलेच हाल झाले...गणेशोत्सवासाठी मोठ्या हौसमौजेने आपापल्या गावाला येणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात सरकारच्या हलगर्जीपणामुळे खड्ड्यांचे असणारे विघ्न ही नेहमीचीच बाब झाली आहे... खड्ड्यांमुळे प्रवास तर सुरळीतपणे होत नाही..याशिवाय संभाव्य अपघाताचा धोकाही मोठा असल्याने चाकरमानी अक्षरशः जीव मुठीत घेऊन आपापल्या गावाला येत असतात... मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे कामधंद्याचे निमित्ताने मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांची संख्या असल्याने व कोकणात गणेशोत्सवाची मोठीच धामधूम असल्याने खास गणेशोत्सव सणासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आपापल्या गावाला येत असतात...राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले रुंदीकरणाचे काम कधी एकदा पुर्ण होऊन प्रवासातील नरकयातना संपून जातील व सुखकर प्रवासाचा अनुभव कधी मिळेल हेच आता प्रत्येकाला वाटू लागले आहे... तर सरकार आणि फसवे दावे करणाऱ्यांची पहिल्याच दिवशी चांगलीच पोलखोल झाली असून नागोठणे माणगाव चक्का जाम तर माणगाव नाजिक अपघात..तर इंदापूर-वावे दिवाळी नाजिक पीकप टेम्पोने प्रवाशी रिक्षाला उडविले… त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अधिक धाकधूक वाढली असल्याचे समजले...

-पळस्पे व माणगावमध्ये जाम - 

मुंबई - गोवा महामार्गावर ठिकठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झालीय.. शनिवारी रात्री पळस्पे फाटयावर ६ ते ७ किलो मिटरच्या तर माणगाव जवळ ४ ते ६ किलो मिटरच्या रांगा लागल्या आहेत...एकाच जागेवर एक एक तास अडकून पडण्याची वेळ पर्यटक, चाकरमानयांवर आल्याने भाविक त्रस्त झाले आहे...

-एकाच मार्गिकेवरून दुहेरी वाहतूक -

पहिल्या टप्प्यात कॉंक्रेटीकरणाचे काम सुरू असलयाने खड्डे युक्त एकाच मार्गिकेवरून मुंबईकडे जाणारी वाहने आणि कोकणात जाणाऱ्या भक्तांच्या गाड्यांची गर्दी झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.. पहिल्याच दिवशी वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे..तर खांब कोलाड मार्गावर एका मार्गिकेचे काम आजही सुरू असल्याने एकच मार्गिका सुरू असल्याने खांब कोलाड दरम्यानच्या लोकल वाहतुकीवर देखील याचा बाजार करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांवर परिणाम झाला असल्याचे बोलले जात होते...

-उपरस्ता ही जाम -खोपोली पाली मार्गावर ५ - ५ किमीच्या रांगा -

मुंबई गोवा महामार्गावर पळस्पे ते इंदापूर हा रस्ता खराब असल्याने कोकणातील असंख्य चाकरमणी एक्सप्रेस मार्गाने खोपोलीपर्यंत येतात.. तेथून परळी, पेडली, पाली, नांदगाव, निझामपुर मार्गे मांणगावपर्यंत उपरस्त्याने प्रवास करून पुढे मुंबई गोवा महामार्गाला कनेक्ट होतात, परंतु शनिवार व रविवारी कोकणात जाणाऱ्या चाकरमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हा उपरस्ता ही ठिकठिकाणी जाम झाला होता... दुपारी परळीजवळ सुमारे ५ ते ६ किमी अंतरावर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसून आल्या...परिणामी कोकणात जाणारे चाकरमणी चांगलेच ताठकळले होते...यंदाही गोवा मार्गाचे काम अपूर्ण असल्याने चाकरमन्यांचे चांगलेच हाल झाले आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post