धाटाव रोहा प्रतिनिधी महेश वाडकर
गावातील लहान मोठी लोक एकञ येवून लाडक्या बापाचे आगमन थाटामाटात
कोकणातील सण म्हणजेच गोरी गणपती प्रत्येक मराठी माणसाचा सण,हिंदु परंपरा जपणारा हा एकमेव सण म्हणजेच गणपती...प्रत्येक गावातील चाकरमानी या सणानिमित्त आप -आपल्या गावी येतो आणि जो गाव इतर वेळी सामसूम असतो त्याच गावातून या गणपती सणानिमित्ताने गावातील लहान मोठी लोक एकञ येवून आपल्या लाडक्या बापाचे आगमन थाटामाटात करतात...आरती ,जागर, किर्तन असे अनेक विविध कार्यक्रम सादर करतात...अशा या वातावरणाने प्रत्येक परिसर, गाव,शहर,अगदी या भक्तिमय होऊन बहारूण जाते...
लाडक्या देवबाप्पाळा वाजत गाजत विसर्जनाचा सोहळा
हा आपला कोकणातील सण वर्षांतून एकदाच येतो...या सणानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोहा तालुका यांच्यावतीने तालुका मर्यादीत गणपती मकर आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...या स्पर्धेसाठी विवीध गावातून खुप चांगले मानवी जीवनावर अधारित देखावे पहायला मिळाले...या मराठमोळ्या सणाचा सोहळा धाटाव थाटामाटात पार पडला...आपल्या लाडक्या देवबाप्पाळा वाजत गाजत विसर्जनाचा सोहळा पार पडला...
