कोलाड प्रतिनीधी(श्याम लोखंडे )
भावपूर्ण जयघोषात भक्तिमय व मंगलमय वातावरणात २५४ जेष्ठा गौरी व ११३८ लाडक्या बाप्पांना भावपूर्ण निरोप
एक दोन तीन चार गणपती बाप्पाचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जय घोषात आला रे आला गणपती आला, गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला, उंदीर मामा की जय, आशा भावपूर्ण जयघोषात भक्तिमय व मंगलमय वातावरणात कोलाड परिसरातील भक्तगणांनी २५४ जेष्ठा गौरी व ११३८ आपल्या लाडक्या बाप्पांना यावेळी भावपूर्ण निरोप देण्यात आला...मात्र कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे गणेश भक्तांचा मोठा हिरेमुड झाला होता...
कोलाड पोलिस प्रशासनाच्यावतीने दुपारपासून कोलाड विसर्जन स्थळांकडे जाणारे मार्ग मोकळे रहावेत यासाठी गस्त
गेली पाच दिवस पावसाची संततधार त्यामुळे भक्त गणांचा मोठा हिरेमुड झाल्याचे दिसून येत होते... तर नाचगाणे करणाऱ्यांचा ही हिरेमुड झाला...तर दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे ही पावसातच विसर्जन झाल्याने अनेकांचा उत्साह हा पाच दिवसांचा गणपती बाप्पांच्या विसर्जनाकडे लागला परंतू शनिवारी पाच दिवसांच्या बाप्पांचा विसर्जनाला ही जोरदार पाऊस असल्याने अनेकांचा उत्साहात हिरेमुड झाले होते..तर कोलाड परिसर व कोलाड विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांनी गणपतीपूर्वीच वीसर्जन घाट व जाणारा मार्ग तसेच तलाव व नदी परिसर स्वच्छता करण्यात आली होती... दुपारी चार वाजल्यानंतर वाजत गाजत,तर काही गुलाल उधळत, लेझिम, टाळ मृदुंग, ढोल ताशाच्या गजरात श्री गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती... एका मागुन एक घरगुती गणपती डोक्यावर घेत विसर्जनासाठी आपल्या परिसरातील नदी किनारी व तलाव ठिकाणी निघाले होते... तत्पुर्वी कोलाड पोलिस प्रशासनाच्या वतीने दुपारपासूनच कोलाड विसर्जन स्थळांकडे जाणारे मार्ग मोकळे रहावेत यासाठी गस्त घालण्यात आली...
मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुकेळी खिंड ते भुवनपर्यंत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवले
भक्तगणांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे गजर करीत परिसरातील तलाव,कुंडलिका नदीपात्र व महीसदरा किनारी भावपुर्ण आणि भक्तीमय वातावरणात गणरायांचे विसर्जन केले...यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलिसांनी विसर्जन मार्गावर आणि नदी किनारी तसेच मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुकेळी खिंड ते भुवनपर्यंत चोख बंदोबस्त ठेवले होते... कोलाड पोलीस स्टेशन हद्दीतील व परिसरातील या आदीदेखील मोठया आनंदाने दिडदिवसांच्या एकुण ७८० बाप्पांचे विसर्जन करण्यात आले असल्याची माहीती कोलाड पोलिस निरीक्षक अजित साबळे यांनी दिली...



